फुलन देवी हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेला शेर सिंह राणा हा नेहमीच चर्चेत राहतो. उत्तराखंड मधील रुड़कीचा असलेल्या शेर सिंह राणा याचे कारनामे चांगलेच प्रसिद्ध आहेत. शेर सिंह यांनी 2004 साली जेलमधून फरार होऊन अफगाणिस्तान मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या अस्थि भारतात आणल्या होत्या. जाणून घेऊया शेर सिंह राणा यांच्याविषयी माहिती खासरेवर…
समाजवादी पार्टीच्या खासदार फुलन देवी हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेला शेर सिंह राणा यांचं यावर्षी फेब्रुवारी मध्ये मध्ये प्रदेशातील माजी आमदाराच्या मुलीसोबत लग्न केल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आला होता. जामिनावर बाहेर आलेल्या राणा याला हुंडा म्हणून दहा कोटींची खाण, 31 लाख रुपये किमतीचा चांदीचा शिक्का आणि बरंच काही मिळाले होते.
का केली फुलनदेवीची हत्या?
शेर सिंह राणा उर्फ पंकज सिंहने 25 जुलै 2001 फुलन देवीची हत्या केली होती. बेहमई कांडाचा बदला घेण्यासाठी शेर सिंह ने हत्या केल्याचा जबाब दिला होता. फुलन देवीने 14 फेब्रुवारी 1981 ला बेहमई मध्ये 22 ठाकुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. दिल्लीच्या सर्वात सुरक्षित म्हणून ओळख असलेल्या अशोक रोडवर त्याने ही हत्या केली होती. हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी त्यानी पोलीस स्टेशनला येऊन या हत्येची कबुली दिली होती.
पुढे तुरुंगात असताना मात्र त्याने लिहिलेल्या जेल डायरी या पुस्तकात पोलिसांनी गुन्हा कबुल करून घेतला म्हणून आरोप केला होता. बेहमई मध्ये 22 राजपुतांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शेर सिंह ने ही हत्या केल्याचं म्हंटलं होतं. 17 फेब्रुवारी 2004 ला राणा जेलमधून फरार झाला होता. त्यानंतर 17 मे 2006 ला कोलकाता मधून पुन्हा अटक करण्यात आली होती.
सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या अस्थि भारतात आणल्या-
जेलमधून फ्लिमी स्टाईलने पळून गेल्यानंतर राणाने सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या अस्थि भारतात आणल्या होत्या. शेर सिंह राणा लहानपणी पासून अफगाणिस्तान मधील गजनी भागात असलेली पृथ्वीराज चव्हाण यांच्या अस्थि विषयी ऐकत आला होता. त्याने निर्धार केला होता की त्यांच्या अस्थि भारतात आणायच्या. जेलमधून फरार झाल्यानंतर त्याने झारखंड मधील रांची मधून नकली पासपोर्ट बनवला. त्यानंतर नेपाळ, दुबई, बांगलादेश मार्गे तो अफगाणिस्तान मध्ये पोहचला. 2005 साली तो सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या अस्थि घेऊन भारतात पोहचला. याचा त्याने व्हिडीओ देखील शूट केला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.