जगातील तेरावे श्रीमंत व्यक्ती आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी काल 9 मार्चला विवाहबंधनात अडकले. आकाश हा मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आहे. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहतासोबत आकाश विवाहबंधनात अडकला. मागील वर्षी आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता.
नुकतंच मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा विवाह पार पडला होता. त्यावेळी देशाभरातील दिग्गजांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती. मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश हा त्यांचा सर्वात मोठा मुलगा असून ईशा ही त्याची जुळी बहिण आहे. तर अनंत अंबानी हा त्यांचा सर्वात लहान मुलगा आहे. आकाश सध्या 4G कंपनी जिओ चा संपुर्ण कारभार सांभाळतात.
कोन आहे अंबानी घराण्याची नवी सून?
श्लोका मेहता हिरे व्यापारी रसल मेहता यांची धाकटी कन्या आहे. श्लोकाने अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधून मानवशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. शिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्समधून कायद्याची मास्टर पदवीही तिने प्राप्त केली आहे. सध्या ती रोझी ब्लू फाऊंडेशन सामाजिक आणि पर्यावरण विभागात काम करत आहे.
अंबानी आणि मेहता कुटुंबाचा अगोदरपासून चांगला परिचय आहे. आकाश आणि श्लोका यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल मध्ये सोबत शिक्षणही घेतले आहे. रसेल मेहता यांचे कुटुंब दक्षिण मुंबईत राहते. आकाश आणि श्लोका हे लहानपणीपासून मित्र आहेत.
एक चांगली बिजनेस वूमन असलेलं श्लोका एक सोशल वर्कर देखील आहे. फिनएप या वेबसाईटच्या रिपोर्ट्सनुसार श्लोकाची वार्षिक कमाई जवळपास १३० कोटी रुपये आहे. २०१४ मध्ये श्लोकाने रसेल मेहता यांच्या रोजी ब्लु फाउंडेशनचे डायरेक्टर पद देखील सांभाळले आहे. त्यानंतर २०१५ मध्ये तिने कनेक्ट फॉर नावाने एक NGO सुरु केली. या NGO च्या माध्यमातून गरजुंना शिक्षण, अन्न आणि निवारा यासारख्या गोष्टी पुरवल्या जातात.
लग्जरी गाड्यांचा शौक-
अंबानी कुटुंबाच्या नव्या सुनेला लग्जरी गाड्यांचा शौक देखील आहे. श्लोका कडे बेंटले कार आहे. जिची किंमत ४ कोटी रुपये आहे. याशिवाय श्लोका कडे मिनी कूपर आणि मर्सिडीज बेन्ज सारख्या कार देखील आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.