सामान्यतः भारतात कैदी आणि कारागृहाविषयी हि चर्चा होते कि भारतात कैदी जास्त आणि कारागृहाची संख्या कमी आहे. कैद्यांना एकाच कोठडीत राहावे लागत परंतु भारतात असे हि एक कारागृह आहे जिथे फक्त एकच आरोपी कैद आहे. कारागृहपण असे कि किल्ल्याप्रमाणे आणि ते हि समुद्राच्या मधोमध आता बघूया कुठे आहे हे कारागृह,
भारतातील केंद्रशाषित प्रदेश दिव मध्ये हे कारागृह स्थित आहे. या कारागृहाची भव्यता बघण्या लायक आहे. सगळ्यात अजब गजब गोष्ट हि आहे कि या कारागृहात फक्त एकच कैदी आहे ज्याचे नाव दीपक कांची आहे. गृह मंत्रालयानुसार दमन आणि दिव हे बाकी राज्याच्या तुलनेत आपल्या कैद्यावर जास्त खर्च करतात. इथे ३२,००० रुपये प्रती कैदी एवढा खर्च होतो.
इथे एका कैद्याकरिता ५ गार्ड, १ चपराशी आणि एक सहायक जेलर ड्युटीवर आहे. हे कारागृह ६० कैद्याची क्षमता असलेले आहे. दीपक कांचीचे वय ३० वर्ष आहे. आणि त्याच्यावर आपल्या पत्नीला जहर देऊन मारून टाकल्याचा आरोप आहे. दीपक वरील आरोप निश्चित झाल्यानंतर त्याला दुसऱ्या जेल मध्ये हलविण्यात येणार आहे.
भारतीय पुरातत्व खाते या कारागृहास पर्यटकासाठी हे कारागृह खुले करावे या प्रयत्नांत आहे. २०१३ साली हे कारागृह बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. काही वर्षा अगोदर इथे ७ कैदी बंदी होते ज्यामध्ये ५ पुरुष आणि २ महिला अशी संख्या होती.
परंतु यापैकी ४ कैद्यांना गुजरात येथील अमरेली जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले. आणि बाकी २ लोकांची देण्यात आलेली शिक्षा पूर्ण झाली. आणि त्यापैकी १ दीपक कांची बाकी आहेत.
अमरेली जेल दिव पासून १०० किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे दीपक कांची करिता बाहेरच्या हॉटेल मधून जेवण येते. इथे काही वेळ करिता दूरदर्शन आणि अध्यात्मिक चैनल बघायची व्यवस्था केलेली आहे. कारागृहात गुजराती वृत्तपत्र देखील येते. तसेच सायंकाळी ४ ते ६ दोन शिपायांच्या निगराणीत त्याला खुल्या हवेत बाहेर पडता येते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.