आपण अशा कोणाला ओळखता कि ज्याच्या कानाजवळ असे छोटे छिद्र आहे. तर आपण हि माहिती अवश्य वाचा. आपण कधी लक्ष दिले असेल तर काही लोकांच्या कानावर एक छोटा खड्डा असतो. आता हि आपल्याला कोणती बिमारी किंवा विकृती वाटत असेल तर हि कोणतीही बिमारी नाही आहे हे लक्षात घ्या. या जन्म झाल्यापासून असतो आणि या खड्डा आरपार जाणारा नसतो. हा कानाच्या वर डोक्याला जुडनाऱ्या ठिकाणी पाहायला मिळतो.
पूर्ण जगात या प्रकारची माणसे नगण्य प्रमाणात आढळतात. आशिया आणि आफ्रिका या खंडात ४ ते १० टक्के लोकांच्या कानावर हे छिद्र आपल्याला आढळेल. तर ब्रिटन मध्ये १ टक्का लोकांच्या तर अमेरिकेत त्याहून कमी लोकांच्या कानावर ते आढळेल. मेडिकल टर्म मध्ये प्रीऑरिक्युलर साइनस असे याला नाव आहे.
याबद्दल सर्वात प्रथम १८५४ साली वैज्ञानिक दृष्ट्या वान ह्यूसिंगर यांनी अभ्यास केला होता आणि त्यांनी हा कोणता आजार नसतो हे मांडले आहे.साधारणपणे हे फक्त कानावरच आढळतो. आणि तो हि एकाच कानावर आढळतो दोन कानावर हा दुर्मिळच असतो.
याबद्दल बिजनेस इन्सायडर ने जी माहिती दिली त्यावरून असा अर्थ काढल्या गेला आहे कि माशांच्या कानापाठीमागे जसे गालफाडे असतात त्याच प्रकारात हे मोजल्या जाते. माणूस आणि मासा यांच्या कानाखाली जे गालफाडे असतात त्याचा अभ्यास करून दोघांच्या संबंधाचा इतिहास मिळू शकतो. आपल्या कानावर हे खड्डे असतील तर आपण घाबरू नका. त्याने आपल्याला कोणतीही हानी होत नाही. या खड्ड्यात कधी काही इन्फेक्शन झाले असेल तर त्यावर अँटिबायोटिक द्वारे उपचार घेऊन बरे होता येते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.