सध्या भारत पाकिस्तान मध्ये अनेक चकमकी घडत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हवाई दलांच्या मार्फत पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक केली. त्यात बालकोट येथील दहशतवादी तळावर कार्यवाही झाली. त्याच्या नंतर पाकिस्तानी हवाई दलाने भारतात घुसखोरी करायचा प्रयत्न केला.त्याला भारताच्या हवाई दलाने जोरदार प्रतिउत्तर दिले. व आपले एक विमान पाकिस्तान च्या हद्दीत पडले त्या सोबत आपला पायलट पकडला गेला होता. विग कमांडर अभिनंदन यांच्या सुटके नंतर पाकिस्तानने काल एक दावा केला आहे.
भारताच्या हवाई दलानंतर नौदल सुद्धा कार्यरत झाल्याचे दिसून येते आहे. यासंबधी पाकिस्तान ने काल एक दावा केला आहे कि पाकिस्तान च्या हद्दीत भारताच्या एका पाणबुडी ने प्रवेश करायचा प्रयत्न केला होता तेव्हा पाकिस्तान च्या टार्गेट वर ती पाणबुडी होती. पण पाकिस्तान ने शांती कायम ठेवण्यासाठी त्या पाणबुड्डीला उडवले नाही. यासंबंधीचा एक व्हिडीओ पाकिस्तान च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावर हा व्हिडीओ ४ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी रेकॉर्ड करण्यात आला असल्याचे त्यावर नोंदवण्यात आले आहे.
पाकिस्तान ने प्रसिद्ध केलेला हा व्हिडीओ इंडिया टुडे चे पत्रकार शिव अरुर यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे तो आपण पाहू शकता. पण पाकिस्तान चा हा दावा खोटा असू शकतो कारण त्यांनी प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ या अगोदर पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केला होता. सध्या हवाई दलाच्या शौर्यानंतर भारतीय नौदल सुद्धा सक्रिय झाले आहे आणि ते पण आपले शौर्य दाखवण्यासाठी उत्सुक आहे.
पण आता पाकिस्तान ने जो दावा केला आहे कि भारतीय नौदल त्यांच्या निशाणावर होते इत्यादी यात कोणतेही तथ्य नाही. भारतीय नौदलाकडे अनेक सबमरीन आहेत ज्यांचा ठावठिकाणा पाकिस्तान सारख्या देशाला सात जन्मात लागणार नाही. त्यामुळे पाकिस्तान चा दावा फोल ठरतो.
*IF THE VIDEO IS AUTHENTIC IN ALL RESPECTS*, then it was recorded at night on Mar 4 in international waters. Infrared video likely recorded from a Pak maritime patrol aircraft. The @IndianNavy appears to be flexing muscle. No official word yet, folks. Will update on this thread. pic.twitter.com/KCEG2R3h0S
— Shiv Aroor (@ShivAroor) March 5, 2019
हा व्हिडीओ २०१६ मध्ये पण दाखवण्यात आला होता असा दावा शिव अरूर यांनी केला आहे-
Of course, there’s always the possibility of Pak recycling footage. Not certain, but the video put out today has similarities to one Pak put out in November 2016. Do compare & check. Here’s the 2016 @DunyaNews bulletin with a video from that time: https://t.co/73P8Ga2p6X pic.twitter.com/K34L3P8iZZ
— Shiv Aroor (@ShivAroor) March 5, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.