भारताने केलेल्या एअरस्ट्राईकला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने त्यांचे लढाऊ विमाने भारत पाठवली होती. त्यांना पळवून लावताना वायुदलाचे पायलट अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात सापडले होते. त्यांचे मिग २१ विमान हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये क्रश झाले होते. त्यानंतर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानवर दबाव आला होता. पण ते युद्धकैदी असल्याने त्यांची सुटका करणे बंधनकारक होते.
जिनिव्हा करारानुसार अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. भारताचा हा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी (१ मार्च २०१९) पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका होऊन भारतात पोहचला .भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर जेट विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. हवेतल्या या लढाईत त्यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमानही पाडले. ते भारतात परत आल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईटवरुन आनंद व्यक्त केला.
अजूनही अभिनंदन यांच्या शौर्याच्या पोस्ट सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. त्यामध्ये आता अमूल या कंपनीने आपल्या भन्नाट जाहिरातीमधून अभिनंदन यांना वेगळ्या पद्धतीने सलाम केला आहे.
अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अनेक तरुणांनी त्यांच्यासारख्या मिशा ठेवण्यास सुरुवात केली आहे. मूळचे बंगळरुमधील असणाऱ्या अभिनंदन यांच्या मिशांचा ट्रेण्ड त्यांच्या शहरामध्ये दिसून येत आहे. देशातील अनेक शहरांमधील तरुणांनी त्यांच्यासारख्या मिशा ठेवत त्यांना सलाम केला आहे. अमूल च्या जाहिरातीमध्ये देखील अभिनंदन यांच्या व्यक्तिमत्वाची झलक बघायला मिळते.
या व्हिडीओमध्ये अनेक पुरुष वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मिशा ठेवताना दाखवण्यात आले आहे. अगदी सलून पासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण या व्हिडीओमध्ये आपल्या मिशांना मिळ देताना दिसतात. या व्हिडीओच्या शेवटी एक मुलगी ग्लासभर दूध पिताना दाखवण्यात आली आहे. दूधाचे ग्लास खाली ठेवल्यानंतर तिच्या ओठांवर दूधाच्या फेसामुळे तयार झालेल्या मिशा दिसून येतात. या व्हिडीओच्या शेवटी ‘मूछ नही तो कुछ नाही’ अशी कॅप्शन देण्यात आले आहे.
बघा व्हिडीओ-
#Amul Mooch: To Abhinandan from Amul! pic.twitter.com/NAG3zNMlIL
— Amul.coop (@Amul_Coop) March 2, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.