Sunday, February 5, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

जॉनी लिवर…कसा घडला ..हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !

khaasre by khaasre
August 18, 2017
in प्रेरणादायी
3
जॉनी लिवर…कसा घडला ..हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !

देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ …नक्की मिळेल .

जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा ‘जॉन प्रकाश ‘ लहानाचा मोठा झाला.
घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची. त्याचे वडील ‘हिंदुस्तान लिवर ‘मध्ये मजुरी करायचे.

त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममध्ये तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत. अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं. कंपनीमध्येही विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा.
कामगारांनी तर त्यांच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील ‘लिवर’ त्याच्या नावाला जोडून त्याला ‘जॉनी लिवर’ हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार.

अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या नजरेस पडला. त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले,की त्यांनी त्याला त्यांच्या “कल्याणजी आनंदजी शो ” साठी परदेश दौ-यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना त्यांचा ‘गॉडडफादर ‘ मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली.

पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला.१९९२ मध्ये आलेल्या ‘बाजीगर’ मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजवू लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला ‘फिल्मफ़ेअर’ पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दरवर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच.

यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतील त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडीअडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला. जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ट्युमर काढला तर मुलाला पैरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते,हे सांगितलं.

त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला. मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहंचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली.त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही.

मित्रानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मलो, यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. आमच्यातील अंगभूत गुणच आम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ देईल…??

Loading...
Tags: bollywoodIndiajohny liver
Previous Post

शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर

Next Post

स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.

Next Post
स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.

स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.

Comments 3

  1. Pingback: स्वतःला पुढे जायचे असेल तर हि बोधकथा जरूर वाचयलाच हवी...c
  2. Arvind Shingne says:
    5 years ago

    very nice photo. l PROUD OF jony liver

    Reply
  3. Arvind Shingne says:
    5 years ago

    very nice post . l PROUD OF jonyliver

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In