मुस्लिमांना अनेक वेळेस देशभक्ती सिद्ध करा असे प्रश्न विचारले जातात किंवा त्यांच्याकडे संशयाच्या दृष्टीकोनातून बघितल्या जाते. मागील काही वर्षात हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला भारतातील अशा एका गावाची सफर घडविणार आहो तिथे प्रत्येक घरात देशभक्ती नसानसात भिनलेली आहे आणि प्रत्येक कुटुंबातील एक तरून भारतीय सेनेत कार्यरत आहे.
राजस्थान मधील झुंझुनूं जिल्ह्यातील मुख्यालयापासून १५ किमी दूर असलेले धनुरी हे गाव आहे. या गावात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात आहे. गावाची लोकसंख्या जवळपास ३,५०० एवढी आहे. या गावाला आदर्श गाव आणि फौजीची खान या नावाने देखील ओळखल्या जाते. या गावचे सरपंच महम्मद इद्ररीश सांगतात कि मला अभिमान वाटतो कि मी या गावचा नागरिक आहे कारण आमचे गाव देशभक्ती साठी प्रसिद्ध आहे.
या एकट्या गावाने आत्तापर्यत ६०० सैनिक दिलेले आहेत. त्यापैकी ३०० सैनिक सध्या विविध ठिकाणी कार्यरत आहे आणि आत्तापर्यंत ३०० सैनिक सेवानिवृत्त झाले आहे. या सैनिका पैकी ९०% सैनिक हे मुस्लीम कुटुंबातील आहे. विशेष तर हे आहे कि काही काही कुटुंबातील ४ पिढ्या देशाच्या संरक्षणाकरिता काम करत आहे.
धनुरी गावातील सैनिकांनी वेगवेगळ्या युद्धात आपले पुत्र देशासाठी अर्पण केलेले आहेत. १९६२ भारत चीन, १९६५, १९७१ व १९९९ भारत पाकिस्तान युद्धात १७ सैनिक शहीद झालेले आहेत. या गावचे पुत्र शहीद हसन मेहमूद खान यांच्या नावाने शाळेचे नामकरण देखील केलेले आहे.
या गावातील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक हमीद खान यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे मोहम्मद इलियास खां, मोहम्मद सफी खां, निजामुद्दीन खां, मेजर महमूद हसन खां, जाफर अली खां, कुतबुद्दीन खां, मोहम्मद रमजान खां, करीम बख्स खां, करीम खां, अजीमुद्दीन खां, ताज मोहम्मद खां, इमाम अली खां, मालाराम बलौदा इत्यादी सैनिक आज पर्यंत शहीद झालेले आहेत.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..