महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर मंदिरास महाराष्ट्रातील प्रत्येक वक्ती आयुष्यात एक वेळ भेट देतो. प्रत्येक गावाकडील माणूस म्हणतो कि मरायच्या आधी एक वेळ पंढरीचे दर्शन करायचे. परंतु या प्रजासत्ताक दिनी पंढरीच्या विठूरायांचे दर्शन वेगळ्या स्वरुपात झाले.
देशाचा रंग तिरंगा या तिरंगा रंगाच्या फुलाने मंदिर सजून निघाले होते. आध्यात्मिक उर्जेसह देशभक्तीची उर्जा देखील २६ जानेवारीला पंढरपुरला मिळत होती. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे खासरे काम कोणी केले. तर आज खासरेवर बघूया कोण आहे हे काम करणारे खासरे कलाकार,
तर या सजावटीचा मान मिळाला होता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त (मित्र परिवार) धायरी पुणे समूह, विठूरायांच्या भक्ती साठी त्यांनी हे मंदिर सजविले होते. या समुहाचे सदस्याची नावे पुढील प्रमाणे आहे. फक्त फुलाची सजावटच नाही तर संपूर्ण मंदिरास विद्युत रोषणाई देखील तिरंगी रंगात करण्यात आली होती.
कर्नेसिअल, झेंडू, तुळस यांचा वापर करून हि सजावट करण्यात आली होती. आणि विठूराया व रुक्मिणीयांच्या गळ्यातील हाराकरिता गुलाब पाकळ्या वापरण्यात आल्या होत्या. त्यामुळे हि सजावट अधिकच शोभून दिसत होती.
या समुहाचे सदस्य सचिन(आण्णा) चव्हाण, संदिपशेठ वि.पोकळे, रुपेश(गणेशदादा) दमिष्टे , प्रविणशेठ पोकळे, पृथ्वीराज(दादा) लायगुडे, दर्शनशेठ रा. मोकाटे, अमोलशेठ पोकळे, कुलदीपदादा पोकळे, सोमनाथभाऊ पोकळे, अविनाश रणपिसे, बाळाभाऊ रणपिसे यांस पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कळसाला आकर्षक विद्युत रोषनाई व गाभा-याला भारतीय ध्वजा प्रमाणे तिरंगी रंग छटा असलेले फुलांची मनमोहक सजावट करण्याचा योग लाभला होता.
या समुहाचे सदस्य गणेशदादा दमिष्टे यांच्या सोबत आमचा संपर्क झाला आहे आपण सुध्दा त्यांना संपर्क करू शकता त्यांचा नंबर 9767 62 8787 हा आहे. त्यांनी केलेल्या या अप्रतिम कामाबद्दल खासरेतर्फे त्यांना मानाचा मुजरा आणि आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
Great team work….?