बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे हा सिनेमा कालच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांचे आयुष्य चितारण्यात आले आहे. एक व्यंगचित्रकार ते शिवसेना प्रमुख असा वादळी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
चित्रपट मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केला आहे. यामुळे देखील चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता लागून होती. अभिजित पानसे यांनी प्रचंड मेहनत घेऊन बाळासाहेबांचे आयुष्य हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सिनेमाला समीक्षकांनी चांगले रिव्हूव्ह दिले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज आहे. याशिवाय हा चित्रपट सकाळी ४.३० वाजता रिलीज करण्यात आला. सकाळी साडेचारच्या शोला देखील लोकांनी गर्दी केलेली बघायला मिळाली.
पण चित्रपट संपतो तो To be continued या शब्दांनी. त्यामुळे ठाकरे २ देखील येणार अंदाज वर्तविला जात आहे. मात्र मनसैनिकांनी आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून ठाकरे २ हा ट्रेलर देखील रिलीज केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
यामधून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा संदेश देण्यात आला आहे. तसंच व्हिडीओच्या प्रत्येक फ्रेममध्ये बाळासाहेबांचा फोटो व या फोटोशी साधर्म्य असणारा राज यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. याचाच गर्भित अर्थ हा की उद्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजे राज ठाकरे अशी मनसैनिकांची भावना असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेकांनी आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करून राज ठाकरेंवर ठाकरे २ येणार असे लिहिले आहे. आता खरोखर ठाकरे २ येणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या व्हिडीओसाठी जे गाणं वापरण्यात आलं आहे तेही ठाकरे सिनेमातलंच आहे. सिनेमाचे निर्माते संजय राऊत आहे जे शिवसेनेचे खासदार आहेत. तर दिग्दर्शक आहेत अभिजित पानसे जे मनसे मध्ये आहेत. मनसेचेच असलेले दिग्दर्शक अभिजीत पानसे खरोखरच राज ठाकरेंवर ठाकरे २ तर काढण्याच्या विचारात नाहीत ना, असा प्रश्नही निर्माण होत आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…