चेहऱ्यावर तेज नसेल तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होत. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही तुम्हाला खासरेवर काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे नक्की तुमचा फायदाच होणार याबाबत आम्ही निश्चित आहो. चला बघूया मग उजळ चेहरा करण्याकरिता घरगुती उपाय…
बेसन हे एक सौंदर्यवर्धक पदार्थ आहे. दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. आणि हा लेप रोज अंघोळीच्या आधी चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा. यामुळे चेहरा उठावदार नक्की दिसेल.
डार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल. अधिक चिंता, जागरण किंवा हार्मोनल बदलामुळे डार्क सर्कल येतात. हा उपाय वापरून तुम्ही ते कमी करू शकता.
तेलकट चेहरा हा देखील एक सौंदर्या मधील अडथळा आहे. यामुळे पिंपल्सची समस्या तयार होऊ शकते. चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो. तुम्ही यामध्ये लिंबाचे 4-5 थेंब देखील टाकू शकता. तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहर्यावर मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहर्यावरील कोरडेपणा दूर होईल.
पुरातन काळापासून उटणे भारतात वापरण्यात येतात. आता परदेशातही याची मागणी वाढत आहे. परंतु जिथे पिकते तिथे त्या वस्तू ची किंमत नसते. ज्वारीचे पीठ, हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे. या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने त्वचेचे तेज हमखास वाढते.
संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दुध मिसळून हे मिश्रण चेहर्यावर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल. मनुष्याचा आहार सुध्दा त्याच्या त्वचेवर परिणाम करत असतो. त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचा ज्युस प्यावा. संत्र्याचे साल कोरडे करून त्याची पेस्ट बनवून चेह-यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. संत्र्याची साल स्क्रबचे सुध्दा चांगल्या प्रकारे काम करत असते आणि चेहर्याचा तेलकट पणही कमी होतो.
मुलतानी माती सौंदर्यवर्धक आहे. माती आणि गुलाब जल एकत्र करून चेह-यावर लावल्यास चेह-याचा रंग निखरतो. एकी काळी ताज महल वर प्रदूषणामुळे आलेल्या काळपटपणा हटवायला मुलतानी मातीचा वापर सरकाने केला होता. काकडी सुध्दा सौंदर्य उजळवायला कामी येऊ शकते. दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद चेह-यावर लावल्यास फायदा होतो.
साधारण चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे मध, दो चमचे दही आणि एका लिंबाचा रस एकत्र करून साधारण अर्धातास चेह-यावर लावून ठेवावा व धूऊन टाकावा. यामुळे चेहरा उजळ होतो. तुमचा दैनदिन कार्य सुध्दा सौंदर्यावर परिणाम करत असते म्हणून रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्युस प्यायल्याने चेह-याचा रंग सुधारण्यास मदत होते.
काजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात. काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहर्यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.
लिंबाच्या पानामुळे त्वचेची रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच्या वापरामुळे चेह-यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. साधारण चार-पाच लिंबाची पाने मुल्तानी मातीमध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले बारीक करून घ्यावे. तयार झालेला हा लेप चेह-यावर 15 मिनिटे लावून ठेवून चेहरा धूवावा.
तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर अर्धातास लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
चेह-याची चमक वाढवण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेह-यावर लावावा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन क्रीम अवश्य लावावे यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत होईल. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचा रंग कमकुवत होतो.
ग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर उपलब्ध असतात. याच्या नियमित सेवनामुळे त्वचेवरील दाग-धब्बे दूर होण्यास मदत होते. सोबतच दिवसभ तुम्ही ताजेतवाने राहणार हे नक्की. चेह-याचा सावळेपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो. काकडीचा रस काढून साधारण 15 मिनिटे चेह-यावर लावून धुतल्यास चेहरा चमकण्यास सुरूवात होते.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळून येते. अक्रोड खाल्ल्याने या तेलाचे मालिश केल्याने चेहऱ्याची कांती वाढू शकते. ओमेगा ३ हे अॅसिड माश्यामध्ये सुध्दा आढळून येतात.पिकलेल्या पपईतील गर चेहर्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे निश्चितच फायदा होणार हे नक्की आहे. चेहऱ्यावर तेज येईल.
एक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहर्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
हि माहिती आवडल्यास आमचे पेज लाईक करायला विसरू नका…