त्याने दहशतवादाचा मार्ग निवडला होता. एकदा हा मार्ग निवडलेला माणूस पुन्हा सुधारणे अशक्यच गोष्ट आहे. जम्मू काश्मीर भागात तरुणांची माथी भडकावली जातात. पण आज एका अशा कथा बघूया जो दहशतवादाचा मार्ग सोडून आला अन देशासाठी शहीद झाला. त्याला आता मरणोत्तर मरणोत्तर देशाचा सर्वोच पुरस्कार अशोकचक्रने सन्मानित करण्यात येणार आहे.
दहशतवादाचा मार्ग सोडून सैन्यात भरती-
या शूरवीर सैनिकाचे नाव आहे लान्सनायक नाझीर वाणी. जम्मू काश्मीरच्या कुलगामधील अश्मूजी गावात राहणारे नाझीर वाणी एकेकाळी दशतवादी होते. काश्मीरमध्ये वाणीसारख्या लोकांना ‘इख्वान’ नावाने ओळखले जाते. जे बंदूक हातात घेऊन कोणाकडून कोणत्याही गोष्टीचा बदल घेण्यासाठी बाहेर पडतात. नाझीरही असेच दहशदवादाच्या मार्गाला गेले. पण पुढे त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली अन ते दहशतवादाचा मार्ग सोडून सैन्यात भरती झाले.
नाझीर वाणी यांनी 2004 मध्ये आत्मसमर्पण केलं होतं. मागील वर्षी 23 नोव्हेंबर 2018 रोजी नाझीर वाणी 34 राष्ट्रीय रायफल्सच्या साथीदारांसोबत ड्यूटीवर होते. तेव्हा शोपियांच्या बटागुंड गावात हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाचे सहा अतिरेकी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचंही समजलं होतं. वाणी आणि टीमला अतिरेक्यांना पळून जाऊ न देण्याचे काम सोपवण्यात आले होते.
त्यावेळी लान्सनायक वाणी यांच्या टीमने सहा अतिरेक्यांचा खात्मा केला होता. त्यापैकी दोन अतिरेक्यांचा खात्मा त्यांनी स्वतः केला होता. पण आपल्या जखमी साथीदाराला वाचवताना ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान आपले प्राण सोडले. 26 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्काराआधी नाझीर वाणी यांना त्यांच्या गावात 21 तोफांची सलामी देण्यात आली. नाझीर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.
मिळाला देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार-
नाझीर वाणी यांना मरणोत्तर शांतता काळात दिला जाणारा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोकचक्र देण्यात येत आहे. त्यांनी सैन्यात असताना इतर पदकेही जिंकले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…