भारतातील गरिबी जास्त प्रमाणात चर्चेत राहते परंतु भरततील श्रीमंती विषयी पुरातन काळा पासून अनेक किस्से चालत आलेले आहे. आज असेच काही किस्से आपण खासरे वर वाचणार आहोत. बडे लोग बडी बाते,
१. लहानपणा पासून अनेकांना पैश्याच्या बिछान्यावर झोपायचं स्वप्न असते. परंतु भारतातील एक कम्युनिस्ट पार्टीचे नेते समर अचर यांनी २० लाख रुपये बिछान्यावर टाकून त्यावर झोपून फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता.
२. पुणे तिथे काय उणे हि म्हण दत्ता फुगे यांनी ३.५किलो चे सोन्याचे शर्ट शिवून घेतले होते. या शर्ट मुळे संपूर्ण भारतात त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. हा सुध्दा एक अजबगजब शौकच आहे.
३. मोठे लग्न करावे हे सर्वाचे स्वप्न परंतु हे स्वप्न अंबानीच्या अगोदर एकाने सत्यात उतरविले आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल यांनी लग्नात तब्बल ६०० करोड रुपये खर्च केले ह्या लग्नात ५०० पाहुणे आणि २००० नौकर उपस्थित होते. या लग्नाचे फोटो हे हेलिकॉप्टर द्वारे काढण्यात आले होते.
४. २०११ मध्ये कंवर सिंह तंवर यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी २५० करोड रुपये खर्च केले होते. आणि लग्नात नवरदेवाला आंदणात हेलिकॉप्टर देण्यात आले. या लग्नात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय देखील उपस्थित होते.
५. केरळ मधील २००३ मधील हि घटना आहे. एका करोडपती बापाने आपल्या ९ वर्षाच्या मुलाला फरारी कार गिफ्ट दिली आणि त्या मुलाने ती गाडी रहदारीच्या भागातून चालवली सुध्दा या घटनेमुळे या करोडपती बापास जेलची वारी देखील घडली होती.
६. अंबानी कुटुंबाच्या बातम्या तर नेहमी वायरल होत असतात यातच एक जोड नीता अंबानीच्या चहाची आहे तिचा चहा तब्बल ३ लाख रुपये एवढ्या किंमतीचा आहे. दिवसाची सुरवात ३ लाख रुपये खर्चाने सुरु होणारे एकमेव कुटुंब असेल.
७. विराट कोहली हा देखील एक चर्चेचा विषय आहे. त्याच्या कडे पैसा तर आहेच परंतु शौक देखील तसेच आहे विराट कोहली जो पाणी पितो ते पाणी स्पेशल फ्रांस या देशावरून बोलविण्यात येते आणि या पाण्याची किंमत १ लिटर ला ६०० रुपये एवढी आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..