अभिनेता हृतिक रोशनचा परिवार फिल्मी जगताशी जुडलेला आहे. त्याचे आजोबा संगीतकार होते तर वडील हे सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. १० जानेवारी १९७४ रोजी पंजाबी परिवारात जन्मलेल्या हृतिकला त्यामुळे अभिनय क्षेत्राचा मोठा वारसा मिळाला. त्यांच्या कुटुंबाला आपण बॉलीवूड कुटुंब देखील म्हणू शकतो.
हृतिक रोशनची एंट्री देखील एवढी धमाकेदार होती कि त्यावेळचा बादशाह सुद्धा हादरला होता. कारण या मुलाने रातोरात भारतीय तरुणांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. तेच स्थान १७ वर्षांनंतरही कायम आहे म्हणलं तरी चालेल. तो दिसण्यातच भारी नसून अभिनयात देखील त्याच दमाचा आहे.
ज्यावेळी हृतिकने बादशाह अकबरचा रोल केला तेव्हा तो हुबेहूब बादशाह अकबर दिसला. आणि परदेशातील सुपरहिरोंसारखा भारताला क्रिशच्या रूपाने मोठ्या पडद्यावर पहिला सुपरहिरो देखील दिला. पण हृतिक रोशनची पहिली कमाई किती आहे माहिती आहे का?
हृतिक एवढ्या मोठ्या कुटुंबातून येतो म्हणल्यावर साहजिकच आपण समजू कि त्याची कमाई देखील तेवढीच मोठी असेल. पण नाही हृतिकची कमाई तुम्ही विचार करताय तेवढी नव्हती. १९८० मध्ये अभिनयातून हृतिकची पहिली कमाई आशा सिनेमातुन मिळाली होती. या सिनेमात जितेंद्र सोबत डान्स करण्याचं काम त्याला मिळालं होतं. यासाठी त्याला १०० रुपये ओमप्रकाश यांनी दिले होते.
हृतिकने अनेक हिट सिनेमे आतापर्यन्त दिले आहेत. त्यामध्ये खासकरून ‘कहो ना… प्यार है’ या पदार्पणाच्या चित्रपटामधील रोहित आणि राजचा डबल रोल प्रेक्षकांना खूप आवडला होता. ‘कभी खुशी कभी गम’,’कोई… मिल गया’ आणि ‘क्रिश’यासह अनेक सिनेमे सुपरहिट ठरले.
हृतिकने टोपण नाव तुम्हाला माहिती आहे का?
ह्रतिकला लहानपणी डुग्गु नावाने ओळखले जायचे. त्याला हे नाव त्याच्या आजीने दिले होते. त्याच्या वडिलांना गुड्डू या नावाने बोलले जायचे. त्यामुळे डुग्गु हे मिळतेजुळते नाव त्याला दिले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…