बाळासाहेब ठाकरे हे आपल्या मिश्किल शैलीतील भाषणासाठी सर्वाना खास परिचित होते. बाळासाहेबांचे शब्दांचे बाण एकदा सुटायला लागले कि ते सुटतच जायचे. बाळासाहेब ठाकरे हे अशे व्यक्तिमत्व होते ज्याची ओळख करून देण्याची गरज नाही पडायची. बाळासाहेब हे एक व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांच्या भाषणाबद्दल बोलले जायचे कि हा एकटा माणूस अख्खा महाराष्ट्र शांत करू शकतो तर एकटाच अख्खा महाराष्ट्र पेटवू सुद्धा शकतो.
एक सामान्य व्यंगचित्रकार ते हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख पर्यंतचा त्यांचा झंजावात अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांचा अनेकदा विविध भागात सभा घेण्याचा योग्य यायचा. या सभांचे काही किस्से आजही अनेकांना आठवतात. मुंबईतील मराठी माणसांना तर बाळासाहेबांबद्दल विशेष प्रेम होते. कधीही न थांबणारी मुंबई बाळासाहेबांच्या निधनानंतर स्तब्ध झाली होती.
मुंबईतील किस्से तर चांगलेच प्रसिद्ध आहेत. बाळासाहेब ज्यावेळी मुंबईत प्रचारासाठी जायचे तेव्हा सभांना प्रचंड गर्दी जमायची. असा एक लोकसभा निवडणुकीदरम्यानचा किस्सा चांगलाच गाजलेला आहे.
आपल्यापैकी खूप कमी जणांना हा किस्सा माहिती असेल. यावेळी तिथे दिवंगत अटळ बिहारी वाजपेयी देखील उपस्थित होते. बाळासाहेबांच्या मिश्किल जोकने वाजपेयींची कशी पंचाईत झाली होती बघूया.
बाळासाहेब ठाकरेंचा तो खास किस्सा –
मधुकर सरपोतदार हे शिवसेनेचे नेते होते. ते १९९० ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पुढे १९९६ साली शिवसेनेकडुन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज प्रचाराला आले होते. ते युतीचे उमेदवार होते.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता. मधुकर सरपोतदार यांच्या प्रचारासाठी युतीची सभा ठेवण्यात आली होती. व्यासपीठावर बाळासाहेब, वाजपेयी, प्रमोद महाजन, जयवंतीबेन मेहता यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होती. सरपोतदार यांच्या विरोधात काँग्रेसचे रिझवी मैदानात होते. यावेळी बाळासाहेबांचे भाषण चालू झाले. बाळासाहेब बोलता बोलता म्हणाले, “रि-टेक ऐकलंय. रि-कंस्ट्रक्शन ऐकलंय. पण हे कसलं यडझवं नाव? रि-झवी?” हे ऐकल्यावर एकच हास्यकल्लोळ झाला.
प्रमोद महाजन खो-खो हसू लागले. वाजपेयींना काही कळाले नाही. ते जयवंतीबेन यांच्या बाजूला बसले होते. सगळे हसताना बघून वाजपेयींना प्रश्न पडला. कि हे का हसत आहेत. त्यामुळे वाजपेयी यांनी जयवंतीबेन यांच्या कानात विचारले कि “हे लोक का हसतायत?”. जयवंतीबेन यांना द्विअर्थी जोक माहिती होता त्यामुळे त्यांचा चेहरा गंभीर झाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…