‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई झेलावी लागलं आहे. या दोघांचं प्रकरण ताजं असताना रोहित शर्मावर एका तरुणीने आरोप केले आहेत.
रोहित शर्माने रितिका सचदेह या बालमैत्रिणींसोबत २०१५ साली विवाह केला. काहीच दिवसांपूर्वी या दोघांना मुलगी झाली आहे. पण या तरुणीने रोहित शर्मावर आरोप करत वादग्रस्त दावा केला आहे. खासरेवर जाणून घेऊया हि आरोप केलेली तरुणी कोण आहे?
कोण आहे हि आरोप करणारी तरुणी-
रोहित शर्मावर आरोप करणारी हि तरुणी आहे सोफिया हयात. सोफिया हयात हि एक मॉडेल आहे. सोफिया बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेली आहे.
सोफिया हयात नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली आहे. तिने व्लाद स्टैन्श्यू सोबत लग्न देखील केले होते. सोफिया ने २४ एप्रिल २०१७ रोजी इस्लामिक पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर सोफिया प्रेग्नेंट देखील राहिली होती. पुढे तिने व्लाद स्टैन्श्यूवर पैश्यासाठी लग्न केल्याचे आरोप करत घराबाहेर काढले होते.
सोफियाने सांगितले आहे कि रोहित आणि तिची भेट एका मैत्रिणीमुळे क्लबमध्ये डान्स करत असताना झाली. पण मला क्रिकेटचा शौक नसल्याने मी रोहितला ओळखत नव्हती असे ती म्हणाली. त्यानंतर क्लबमध्ये आमच्यात जे काही झाले ते खूप लवकर झाल्याचे सोफियाने म्हंटले आहे. क्लबमध्ये रोहितने किस केल्याचं तिने म्हंटलं आहे.
रोहित शर्माने तिची मीडियाला फॅन म्हणून ओळख करून दिली होती. त्यामुळे आपल्याला दुःख झालं व रोहितपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचे सोफियाने म्हंटले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…