भारताने नुकतेच ऑस्ट्रोलियाचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रोलियाविरुद्ध वनडे मालिकेत खासकरून धोनीवर सर्वांची नजर होती. धोनीने या मालिकेत मालिकावीर बनत सर्वाना आपण अजूनही फिट असल्याचे दाखवून दिले. धोनीने तब्बल 8 वर्षानंतर मालिकावीरचा किताब जिंकला.
हा दौरा संपवून भारत न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध आज पहिला वनडे सामना नेपिअर मध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने आपला फॉर्म कायम राखला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला.
पहिल्या वन डे सामन्यात भारताला विजयासाठी अवघ्या 158 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी 3 आणि युजवेंद्र चहलने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.
धोनीने दाखवून दिली पुन्हा एकदा त्याच्यातील कर्णधाराची चुणूक-
धोनी ऑस्ट्रोलियाविरुद्ध दौऱ्यात त्याच्या काही टिप्समुळे देखील चर्चेत राहिला होता. धोनीने आज देखील यष्टिमागची आपली कामगिरी उल्लेखलनीय ठेवली. त्याने आज एक सल्ला दिला आणि त्यात फलंदाज फसला. त्यापूर्वी धोनीने एक वेगवान स्टॅम्पिंग पण केले.
वेगवान स्टॅम्पिंग-
King ? pic.twitter.com/0HE4TZ0UgJ
— Prem Chopra (@premchoprafan) January 23, 2019
गोलंदाज धोनीच्या सल्लानुसार गोलंदाजी करतात आणि त्यातून भारताला यश मिळते हे दिसून आले. आज शेवटची विकेट बाकी असताना धोनीने कुलदीपला सल्ला दिला आणि बोल्ट त्यात अडकला. यष्टिमागून धोनीने कुलदीपला एक सल्ला दिला. तो म्हणाला,” हा ( ट्रेंट बोल्ट) डोळे बंद करून खेळेल तू याला दुसरा टाक ( ये आंख बंद करके खेलेगा, दुसरा वाला डाल सकता है इसको.)” कुलदीपने ते ऐकले आणि पुढच्याच चेंडूवर बोल्ट स्लीपमध्ये रोहित शर्माच्या हातात झेल देऊन माघारी फिरला.
धोनीच्या या सल्ल्याचा व्हिडीओ ट्विटरवर अनेकांनी ट्विट केला आहे. यानिमित्ताने धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले धोनी धोनी आहे.
बघा व्हिडीओ-
@msdhoni literally dictated that last wicket step by step before it happened. #NZvIND #Dhoni pic.twitter.com/QwPyuE1mEv
— Venkat Iyer (@Vencuts) January 23, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…