भारताकडून १० वनडे सामने खेळलेले माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेकब मार्टीन हे सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. जेकब यांचा २८ डिसेंबर रोजी त्यांच्या स्कुटरवर जाताना अपघात झाला होता. त्या अपघातात ४६ वर्षीय जेकब मार्टिन हे गंभीर जखमी झाले होते.
बडोदा मधील एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांच्या कुटुंबाकडचे पैसे इलाजात संपले आणि पुढील इलाज करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यानंतर बीसीसीआय आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी अगोदर त्यांना मदतीचा हाथ दिला.
मार्टिन यांच्या पत्नीने सर्वात अगोदर बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली होती.बीसीसीआयने त्यांना तात्काळ ५ लाख रुपयांची मदत केली. तर बडोदा क्रिकेट असोसिएशनने देखील त्यांना ३ लाखांची मदत केली. पण मार्टिन यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांचा खर्च खूप आहे. त्यामुळे कुटुंबाला पैसे कमी पडत होते.
मदतीला धावून आला पांड्या-
मार्टिन यांच्या फुफ्फस आणि लिव्हरला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचारासाठी प्रतिदिन जवळपास १ लाख रुपये खर्च येत आहे. त्यामुळे मार्टिन कुटुंबाला मदतीची खूप आवश्यकता होती.
या संकटाच्या काळात कृणाल पांड्या मार्टिन यांच्या मदतीला धावून आला आहे. कृणालने मार्टीन यांच्या मदतीसाठी चक्क एक ब्लँक चेकच दिला आहे.
मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती. पांड्या हा देखील मूळचा बडोद्याचा आहे. कृणालने मार्टिन यांना एक अट देखील घातली आहे. ज्यामध्ये त्याने मार्टिन यांना कमीत कमी एक लाख रुपये चेकमध्ये लिहिण्याचे सांगितले आहे. तर जास्तीत जास्त जेवढी मदत लागेल तेव्हडी या ब्लँक चेकमध्ये टाकण्यास सांगितले आहे.
कोण आहेत जेकब मार्टिन-
जेकब मार्टिन हे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी १९९९ साली सौरव गांगुली कर्णधार असताना वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारतीय संघाकडून १० वनडे सामने खेळले आहेत. तसेच ते १३८ फर्स्ट क्लास सामनेही खेळले आहेत. यात त्यांनी ४७ च्या एव्हरेजने ९१९२ धावा काढल्या आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…