नोटबंदी नंतर भारतात कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली, यामध्ये कॅश ऐवजी कार्ड वापरणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. कार्ड्सचे पण वेगवेगळे प्रकार असतात जसे मास्टरकार्ड, रूपे, व्हिसा, कार्ड कोणत्या प्रकारचं आहे हे उजव्या बाजूला खाली नमूद केलेलं असत. मात्र मास्टरकार्ड, रूपे, व्हिसा यामध्ये नेमका फरक काय हे जाणून घेऊयात.
१) रूपे ही स्वदेशी व्यवहार प्रणाली आहे तर मास्टरकार्ड, व्हिसा या विदेशी आहेत. रूपे ही प्रणाली २०१४ पासून व्यवहारात वापरली जाते. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम यांच्याद्वारे ही प्रणाली विकसित केली गेली आहे.
२) रूपे जगातील ६ वी प्रणाली आहे या अगोदर फक्त अमेरिका, जपान, चीन, सिंगापूर, ब्राझील यांच्याकडे अश्या प्रकारच्या प्रणाली होत्या.
३) रूपे स्वदेशी असल्यामुळे व्यवहार शुल्क कमी द्यावे लागते. उदा. जर तुम्ही २००० चा व्यवहार कार्ड व्दारे केला तर रूपे साठी बँकांना फक्त २.५० रु. द्यावे लागतात मात्र जर मास्टरकार्ड, व्हिसा साठी ३.२५ रु. द्यावे लागतात.
४) भारतातील प्रणाली असल्यामुळे रूपे व्दारे व्यवहार पटकन होतात. ५) बँकांना मास्टरकार्ड, व्हिसा साठी प्रवेश शुल्क द्यावे लागते तेच रूपे साठी द्यावे लागत नाही. ६) मास्टरकार्ड, व्हिसा साठी ग्राहकांना तिमाही शुल्क द्यावे लागते जे रूपे साठी द्यावे लागत नाही.
७) मास्टरकार्ड, व्हिसा हे कार्ड प्रकार जास्त खर्च करणाऱ्या वर्गा कडून वापरल्या जातात तर जन धन योजना लाभार्थी, माध्यम वर्ग रूपे कार्ड वापरतात परिणामी रूपेच्या वापरासंबधीत जनजागृती करणे गरजेचे आहे.
-अश्विनी खंडागळे
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.. आणि आमचे पेज लाईक करायला विसरु नका…