बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच अनेक गोष्टींसाठी चर्चेत येत आहे. ठाकरेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यामध्ये दाखवलेला बाळासाहेबांचा आवाज अगोदर चर्चेत आला.
प्रेक्षकांना बाळासाहेबांचा आवाज बिलकुल आवडला नाही. आवाज बदलण्याची खूप मागणी झाल्यानंतर यामधील बाळासाहेबांचा पूर्वीचा आवाज बदलण्यात आला. नेटकऱ्यांच्या मागणीची दखल निर्माते आणि दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज बदलला.
आवाजाचे जादुगार, प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल यांच्याकडून बाळासाहेबांचा आवाज डब करून घेण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटातील काही डायलॉग सुद्धा चर्चेत आले आहे. दक्षिण भारतीयांबद्दल आक्षेपार्ह संवाद काढून टाकण्याची मागणी झाली.
पण यामध्ये एका डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर आता चालू झाली आहे. यामध्ये बाळासाहेबांचा हा डायलॉग मोदींसाठी तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सेना सत्तेत असून सुद्धा मोदींवर आणि भाजपवर टीकेची एक संधी सोडत नाही. त्यामुळे चित्रपटातील हा डायलॉग सुद्धा मोदींना टोला तर नाही ना? असा प्रश्न पडतो.
बघा बाळासाहेबांचा हा डायलॉग-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…