विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटामध्ये भारताच्या सूडाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’ सारखे अंगावर शहारे आणणारे डायलॉग या सिनेमात आहेत. विकी कौशल, यामी गौतम यांनी दमदार अभिनय या सिनेमात केला आहे.
उरी चित्रपटात सर्जिकल स्ट्राईक या खरोखर घडलेल्या घटनेची कहाणी आहे. पाकिस्तानने १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरीमध्ये भारतीय सैन्य शिबिरावर हल्ला केला होता. यामध्ये २१ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने एलओसी पार करून PoK मध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. चित्रपटात अभिनेता विकी कौशलने जी भूमिका साकारली आहे, तो सैनिक खऱ्या आयुष्यात कोण होता जाणून घेऊया खासरेवर..
कोण होता तो जवान-
सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्वाची भूमिका निभावणार्या त्या जवानाचे नाव होते लान्स नायक संदीप सिंह. संदीप सिंह हे २००७ साली सैन्यात भरती झाले होते. ते सर्जिकल स्ट्राईकवेळी पॅरा कमांडो तुकडीमध्ये सामील होते. गुरुदासपूर जिल्ह्यातील घुम्मणकला हे संदीप सिंह यांचं गाव होतं. संदीप सिंह यांचा वडील जगदेव सिंह, आई कुलविंदर कौर, पत्नी गुरप्रीत कौर आणि पाच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
सर्जिकल स्ट्राईक चे संदीप सिंह झाले कुपवाडा येथे शहीद-
२३ सप्टेंबर रोजी कुपवाडा येथील तंगधार मध्ये आतंकवाद्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संदीप सिंह पॅरा कमांडो तुकडीसोबत तिथे सर्चिंग ऑपरेशन करणाऱ्या टीमला लीड करत होते.
रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये दोन आतंकवादी मारले गेले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा हे ऑपरेशन चालू झाले तेव्हा अजून ३ आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. पण यादरम्यान संदीप सिंह यांना एक गोळी लागली.त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तिथे पण आपल्या टीमला वाचवण्यासाठी त्यांनी आपले प्राण गमावल्याचे बोलले जाते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…