गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल हे बोहल्यावर चढणार आहेत. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावी अत्यंत साधेपणानं हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
या विवाह सोहळ्याचं निमंत्रण फक्त १०० व्यक्तींना दिले जाणार असल्याचे कळते. त्यात वधुवराचे कुटुंबीय व जवळच्या मित्रमंडळींचा समावेश असेल. विवाहाचे सर्व विधी पटेल कुटुंबीयांचं कुलदैवत असलेल्या बहुचर आणि मेल्दी माता मंदिरात होणार आहेत. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावी अत्यंत साधेपणानं हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
कोण आहे हार्दिक यांची भावी पत्नी-
येत्या २७ जानेवारीला हार्दिक पटेल बोहल्यावर चढणार आहेत. हार्दिक हे त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. हार्दिक आणि किंजल हे अनेक वर्षे अहमदाबाद जिल्ह्यातील विरामगाम तालुक्यातील चंदननगरी परिसरात राहायचे.
त्यावेळी हार्दिकची बहीण मोनिका आणि किंजल या शाळेत सोबत होत्या. त्यामुंळे किंजलचे हार्दिकच्या घरी येणे जाणे असायचे. त्यातून त्यांची ओळख झाली. पटेल आणि पारीख कुटुंबांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध होते. या दोघांचे ओळखीतून प्रेमात रूपांतर झाले. किंजलचे शिक्षण सध्या सुरु आहे.
किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून सध्या गांधीनगरमधील एका लॉ कॉलेजातून एलएलबी करतेय.
या विवाहाबाबत त्यांच्या वडिलांनी माहिती दिली आहे. त्यांनी हा आंतरजातीय विवाह नसल्याचे देखील सांगितले आहे. पारीख आडनाव असले तरीहि किंजल हि पाटीदार समाजातील असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
‘हार्दिकनं लवकरात लवकर विवाहबद्ध व्हावं अशी आम्हा सगळ्यांचीच इच्छा होती. त्यासाठी ही योग्य वेळ आहे असं वाटल्यानं किंजलच्या आई-वडिलांशी चर्चा करून आम्ही २७ जानेवारी ही तारीख ठरवलीय.’ असं हार्दिकचे वडील भरत पटेल म्हणाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…