महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छमछम पुन्हा सुरु झाल्याने २ दिवसांपासून मोठी टीकेची झोड उठली आहे. पण महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आणि छमछम पुन्हा सुरु झाली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या.
आता संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत महाराष्ट्रात डान्स बार सुरु राहणार आहेत. दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 2005 साली डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. आर आर पाटलांनी डान्सबार बंदीचा निर्णय का घेतला होता बघूया..
म्हणून घेतला डान्सबार बंदीचा निर्णय-
डान्सबारमुळे खेडोपाड्यातील श्रीमंताच्याबरोबरच त्यांच्या आजूबाजूला असणारी सर्वसामान्य मुले बरबाद होत होती. डान्सबारची कीड महाराष्टात खूप पसार चालली होती. डान्सबारमध्ये फक्त पैश्यांची उधळण होत असे. त्यामुळे अनेक तरुण बरबाद होत होते. तर यामधून खूप पैसे मिळत असल्यानं अनेक मुलींचा कल याकडे वाढला होता.
मुलींना चांगला मोबदला आणि पैशाचे आमिष दाखवून मुंबईत आणण्यात येत होते. डान्सबारमुळे मद्य, मदनिका आणि पैसा या तीन गोष्टी एकत्र येत होत्या. या तीन गोष्टी एकत्र आल्या कि गुन्हेगारी वाढते. अनेक गुन्हेगार देखील डान्सबारला आपला अड्डाच बनवत होते. या सर्व गोष्टींमुळे डान्सबार संस्कृतीला वैतागलेल्या कुटुंबांनी आपली व्यथा सरकार समोर त्यावेळी मांडली होती.
डान्स बारमुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे आबांना समजल्यावर त्यांनी त्यावर बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण यामध्ये एक घटना खूप ह्रदयद्रावक घडली ज्यामुळे आर आर आबांनी तात्काळ डान्सबार बंदीचा निर्णय घेतला.
ज्या आजीने नातवाला लहानपणी मांडीवर घेतले त्याच आजीचा मोठेपणी डान्स बारमध्ये उधळायला पैसे न दिल्याने नातवाने खून केला. आर आर ;पाटलांना जेव्हा हि घटना समजली तेव्हा ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी संवेदनशीलता दाखवत हा निर्णय घेतला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
एका रात्रीची कमाई ९० लाख! हि होती देशातील सर्वात श्रीमंत बारबाला..