पंजाबच्या नवांशहर मध्ये जन्मलेले अमरीश पुरी यांनी वयाच्या २२ व्या वर्षी सिनेमात काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते. हि गोष्ट आहे १९५४ ची. भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष लोटली होती. पण त्यांना या ऑडिशन मध्ये नाकारण्यात आले होते. निर्मात्याने त्यांचा चेहरा खूप विद्रुप असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर पुरी हे रंगमंचाकडे वळले. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे निर्देशक हिंदी रंगमंचावरील मोठे नाव इब्राहिम अल्काजी यांनी १९६१ मध्ये पुरी यांनी थिएटर मध्ये आणले. त्यावेळी अमरीश पुरी हे मुंबईतील कर्मचारी विमा निगम मध्ये नोकरी करत होते आणि सोबतच ते थिएटर मध्ये देखील सक्रिय झाले. थोड्याच दिवसात ते महान रंगकर्मी सत्यदेव दुबे यांचे सहाय्यक बनले.
दुबे यांच्याकडून शिकताना त्यांना सुरुवातील नको वाटायचे. पण दुबे यांनी पुरींना ट्रेन केले आणि पुरी पण मग त्यांना आपले गुरु मानायला लागले. पुढे अमरीश पुरीच्या अभिनयाची चांगली चर्चा व्हायला लागली.
सिनेमासाठी सोडली २१ वर्षांपासूनची सरकारी नोकरी-
पुढे त्यांना सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या. त्यावेळी त्यांनी कर्मचारी विमा निगमची २१ वर्षांपासूनची नोकरी त्यासाठी सोडली. राजीमाना दिला त्यावेळी ते A ग्रेडचे अधिकारी होते. ‘रेशमा और शेरा’ (1971) या डायरेक्टर सुखदेव यांच्या सिनेमासाठी त्यांना एका ग्रामीण मुस्लिम व्यक्तीच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा निवडण्यात आले. त्यावेळी त्यांचे वय ३९ वर्ष होते.
अमरीश पुरी यांनी ७० च्या दशकात अनके हिट सिनेमे केले. पण त्यांना खरी ओळख १९८० मध्ये मिळाली. डायरेक्टर बापू यांच्या हम पांच या सिनेमात त्यांनी संजीव कपूर, मिथुन चक्रवर्ती, नसूरद्दीन शाह, शबाना आजमी, राज बब्बर यांच्यासोबत काम केले. त्यांची या सिनेमातील ठाकूर वीर प्रताप सिंहची भूमिका खूप गाजली.
खलनायक म्हणून मिळाली ओळख-
डायरेक्टर सुभाष घई यांच्या ‘विधाता’ (1982) सिनेमापासून तर ते खलनायक म्हणून खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी या सिनेमानंतर मागे वळूनच नाही बघितले. त्यानंतर येणारे प्रत्येक सिनेमे अमरीश पुरी यांच्या खलनायकी रूपाशिवाय पूर्ण होते नव्हते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…