सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधी ही खूप महत्त्वाचची गोष्ट असते. जसा जसा काळ बदलत गेला आहे तसा तसा नैसर्गिक विधीला जाण्याचा पद्धती वेगाने बदलत गेल्या आहेत. मानवी वस्तीच्या सर्वात पुरातन खुणा हडप्पा संस्कृतीत सापडतात. हडप्पा संस्कृतीत मल व मूत्रनिस्सारणचे सुयोग्य व्यवस्थापन होते. शौचाला जाताना पाण्याचा वापर करणारी पहिली संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती अशी नोंद आहे. पुढे इजिप्तनेही हीच पद्धती अवलंबली.
आज आपण जे पारंपरिक, आधुनिक, अत्याधुनिक टॉयलेट पॉट पाहतो त्याचे मूळ जनक आहेत जॉन हेरिग्टन. तएलिझाबेथ राणीकडे कामाला असणाऱ्या हेरिग्टन यांनी 1556 मध्ये बंदिस्त जागेत वापरता येईल असे टॉयलेट तयार केले. जगातील पहिले डब्ल्यूसी टॉयलेट म्हणून त्याला ओळखले जाते. नंतर जोसेफ ब्राहम यांनी 1718 मध्ये या टॉयलेटला एक फ्लॅश जोडला.
पूर्वीच्या काळासारखी आजही जगभरातल्या शौचालयामध्ये विविधता दिसते. काही शौचालये आसनावर बसून वापरावी लागतात तर काही ठिकाणी उकिडवं बसावं लागतं. काही ठिकाणी पाण्याची बादली वापरावी लागते तर काही ठिकाणी एक पाण्याची टाकी भरलेली असते आणि आपण एक खटका दाबला की पाणी शौचपत्रात वाहू लागते.
काही शौचालयामध्ये पार्श्वभाग पुसायला कागद ठेवलेले असतात तर काही ठिकाणी यासाठी नळ किंवा पाण्याची बादली असते. काही शौचालय अशी असतात जिथे अजिबात पाणी वापरले जात नाही, ते म्हणजे विमानातलं शौचालय. इतक्या हेलकाव्यात पाणी असणं म्हणजे गोंधळ होईल ना? तिथला मैल व्हॅक्युम क्लिनरने एका पोकळीत ओढून घेतला जातो आणि एका टाकीत साठवला जातो. विमान जमिनीवर उतरल्यावर हा मैला टाकून दिला जातो.
हे सर्व ठीक आहे पण अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊ शकतो की अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे उडणारे माणसं, उडणारे जेवण, पाणी, कपडे इत्यादी. मग अशावेळी अंतराळवीर शी व शु कशी करत असतील? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर खासरेवर…
अंतराळातील टॉयलेट व्यवस्था-
तंत्रज्ञानाबरोबर अंतराळात राहायचा कालावधी पण वाढत गेला आहे. अनेक सुधारणा यात झाल्या आहेत. अंतराळात विशेष प्रकारचे टॉयलेट डिझाईन केलेले असतात. यामध्ये दोन प्रकार टॉयलेट असतात. लघुशंका आणि शौचासाठी वेगवेगळया टॉयलेटची व्यवस्था असते.
शौचासाठीची व्यवस्था-
अंतराळात शौचासाठी एक छोटे सीट असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शौच करताना मैला शटर मध्ये पसरू नये म्हणून सर्व घाण ओढून घेण्यासाठी अवकाशयानात व्हॅक्युम क्लिनर बसवलेले असते. यामुळे पसरलेला दुर्गंध सुद्धा फिल्टर करून काढला जातो. नासाने तर चक्क 19 मिलियन डॉलर्स खर्चून स्पेस टॉयलेट बनवून घेतले आहे. ज्याचा वापर अंतराळात केला जाईल. ज्यात पाण्याची वाफ होऊन नंतर मैलाचे रूपांतर रासायनिक प्रक्रियेने धुलिकनामध्ये होईल.
लघुशंकेची व्यवस्था-
शौचप्रमाणे लघुशंकेसाठी सुद्धा अवकाशयानात वेगळी व्यवस्था असते. वेस्ट कलेक्शन सिस्टीमद्वारे सर्व मलमूत्र एका जागी जमा केले जाते. तंत्रज्ञानासोबत अनेक बदल यामध्ये बघायला मिळत आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा अशाच प्रकारे नवनवीन गोष्टी अंतराळात टॉयलेटसाठी बघायला मिळतील.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…