तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 7 गडी आणि 4 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयात महेंद्रसिंग धोनीने खेळलेल्या दमदार खेळीने भारताला हा सामना जिंकून दिला. धोनीने 114 चेंडूत 87 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 48.4 षटकात अवघ्या 230 धावांत गुंडाळला आहे. ऑस्ट्रेलियातर्फे पीटर हॅन्ड्सकॉम्ब याने सर्वाधिक 58 धावा केल्या.
231 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारतातर्फे महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक 87 धावा केल्या. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा हा सामना जिंकणे भारताला कठीण जाईल असे वाटत होते. पण त्याचवेळी आपल्या मराठमोळ्या पुणेकर केदार जाधवने धोनीला साथ दिल्याने हा सामना भारताला जिंकता आला.
मॅचच्या शेवटी येतो अन जबरदस्त मारून जातो-
केदारच्या अगोदर कर्णधार विराट कोहलीने 62 चेंडूत 46 धावा करत चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहली बाद झाल्यानंतर केदार जाधव मैदानात आला. दुखापतीतून सावरलेला केदार जाधव मालिकेतील हा पहिलाच सामना खेळत होता. पण केदारने आपला फॉर्म कायम ठेवत अगोदर गोलंदाजी सुद्धा चांगली केली. अन नंतर फलंदाजीत सुद्धा चुणूक दाखवली.
केदार जाधवने 57 चेंडूत 61 धावा करत धोनीला चांगली साथ दिली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेले 231 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज पार केले
231 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारतातर्फे महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक 87 धावा केल्या त्याला केदार जाधवने 61 धावा करत उत्तम साथ दिली. धोनीवर दबाव होता पण तो दबाव केदारच्या खेळीने कमी झाला. जर केदारने एका बाजूने किल्ला लढवला नसता तर धोनीवर दबाव वाढला असता. आणि त्याच्या खेळीवर याचा परिणाम झाला असता.
पण महाराष्ट्राच्या या सह्याद्रीपुत्राने मॅचच्या शेवटी येऊन जबरदस्त मारून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला.
केदारची कालची जबरदस्त खेळी-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…