भारत हा प्राचीन काळापासून महानतेच्या शिखरावर राहिला आहे पण आपल्या कामजोरीचा फायदा विदेशी लोकांनी उचलायचा प्रयत्न केला आहे. यामुळे अन्य देश आज खूप विकसित झाले आहेत पण आपण त्या प्रमाणात मागे राहिलो होतो. पण आता भारत सुद्धा सर्व क्षेत्रात खूप प्रगती करत आहे. पण विदेशी देश जी काही आज प्रगती करत आहेत त्याचा आधार हा भारत आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. यासोबतच काही गोष्टी तर अशा आहेत ज्याचे उत्तर विज्ञानाकडे सुद्धा नाहीये. आपण आज खासरेवर जाणून घेऊया या गोष्टी ज्या आजपर्यन्त सर्वांसाठी न सुटलेलं कोडं राहिल्या आहेत.
1. प्रहलाद जानी-
यांना जगातील आठवं आश्चर्य मानले जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की प्रहलाद जानी यांनी मागच्या 70 वर्षात अन्नाचा एक दाना सुद्धा खाल्लेला नाहीये. परंतु या गोष्टीची माहिती जेव्हा भारत सरकारला कळली तेव्हा या गोष्टीची खात्री करण्यासाठी प्रहलाद जानी यांच्यावर पंधरा दिवस नजर ठेवण्यात आली. पण यानंतर जे समोर आलं ते खूप थक्क करणारं होतं. प्रहलाद जानी यांच्यासमोर विज्ञानाने सुद्धा हार मानली आहे. प्रहलाद जानी यांचे म्हणने आहे की त्यांना माँ भगवती जगदंबाच्या कृपेने भुकेची आठवण होत नाही. तुम्हाला जर वाचून विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः इंटरनेटवर किंवा गुजरात मधील अंबाजी धाम मध्ये त्यांचं दर्शन करू शकता.
2. अशोक सम्राट यांची संस्था-
भारतातील महान सम्राट अशोक यांच्याकडे नऊ लोकांची अशी एक संस्था होती जी ज्ञान आणि बुद्धीचा खजाना होते. प्राचीन इतिहासातील पानं चाळल्यानंतर माहिती कळते की सम्राट अशोक यांनी अशा नऊ लोकांची सेना तयार केली होती ज्यांच्याकडे टाइम ट्रॅव्हल आणि कोणत्याही वस्तूला अन्य वस्तूमध्ये परिवर्तन करण्याच्या अद्भुत माहिती असणारी पुस्तके होती. परंतु काळासोबत त्या नऊ लोकांची संस्था अन्य ग्रहावर लुप्त झाली.
3. चुंबकीय टेकडी-
हिमाचल प्राचीन काळापासून प्रसिद्ध पर्वताच्या संख्येत सामील आहे. इथे पूर्व क्षेत्रात एक अशी टेकडी आहे जिथे तुम्ही गाडी न्यूटल करून उभी केली तर ती चालायला लागते. स्थानिक लोकं या टेकडीला चुंबकीय टेकडी म्हणून ओळखतात. पण या टेकडीच्या मागचे रहस्य अजूनही कोणी समजू शकले नाहीये. शास्त्रज्ञ आजसुद्धा या गोष्टीचा शोध घेत आहेत पण त्यांना यात यश मिळालेलं नाहीये.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…