मुंबई म्हटले कि अनेक गोष्टी प्रसिध्द आहेत. परंतु या सोबतच मुंबईला थोडीशी बदनामीची किनार देखील लाभलेली आहे. ग्रांट रोड असो का मुंबईतील फेमस डान्स बार आणि त्या मधल्या बार बाला काही काही बार बाला करोडोच्या मालकिणी झाल्या आणि बहुतांश इतिहासाच्या पडद्यात गायब झाल्या. तर आज बघूया खासरेवर मुंबईच्या डान्सबार च्या इतिहासाबद्दल
या डान्स बार ला अगोदर कैब्रे बार म्हणून ओळखत होते. हा काल स्वतंत्रपूर्व आहे. ज्यामध्ये नृत्यागना आपल्या अंगावरील एक एक कपडा काढून टाकत असे. कुलाबा, नरीमन पॉईंट येथे ५ आणि घाटकोपर मध्ये एक असे ६ कैब्रे बार प्रसिध्द होते. परंतु इथे ग्राहक हा भारतीय नसून इंग्रज येत असायचे. आणि नृत्यांगना देखील पाश्चिमात्य होत्या.
सर्वात पहिली डान्स बार मुंबईमध्ये १९८० साली मंत्रालया समोर मेकर्स चेम्बर मध्ये सोनिया महाल नावाची सुरु झाला. त्या९० नंतर हे जाळे वाढतच गेले. ८० ते ८५ मध्ये मध्ये संपूर्ण मुंबईत ९०च्या आसपास अनेक डान्स बार सुरु झाले. बार मालकांची या मुली मुळे एवढी कमाई होऊ लागली कि त्यांनी पगारा एवजी टिप्स मध्ये ७०% त्यांचा हिस्सा असे काम सुरु केले.
बारबाला हा शब्द मुळात मराठीतला नाही आहे हा शब्द इंग्रजी आणि मराठीच्या मिश्रणातून आलेला आहे. बार बालाचे जास्त प्रमाण विशेष जातीतून आलेल्या आहेत मुस्लीम डेरेदार, सांसी, नट, गंधर्व, बेडिया कंजर अश्या जातीतल्या ह्या मुली होत्या. ह्या मुली दुसर्या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या आहेत.
२००५ मध्ये जेव्हा डान्स बार वर बंदी आली तेव्हा यांच्या वर उपास मारीची वेळ आली. काही बार बाला दुबई सारख्या देश्यात गेल्या आणि काही अर्केस्टा मध्ये काम करू लागल्या. तरन्नुम नावाची बार बाला हि प्रकाश झोतात आली जेव्हा अब्दुल क्रीम तेलगी याने ९० लाख रुपये एका रात्रीत उधळले आणि त्याचा मुन्द्रांक घोटाळा जगासमोर आला.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..