कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” या कार्यक्रमातील अनेक जोरदार परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. छोट्या बच्चे कंपनीने आपल्या सुरांनी सर्वाना भुरळ घातली आहे. यामध्ये आघाडीवर असलेले नाव आहे हर्षद नायबळ.
हर्षद नायबळने गायलेले अनेक गाणे हिट ठरले आहेत. त्याला प्रेक्षकांचा भरघोष प्रतिसाद मिळत आहे. हर्षद गाण्यांबरोबर आपल्या मस्तीमुळे देखील सतत चर्चेत राहतो. त्याच्या मस्तीमुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे. ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन मस्ती प्रेक्षकांना आवडते. एवढ्या कमी वयात तो एकदम बिनधास्त बोलतो.
या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्याची ओळख करून द्यायची पण गरज पडत नाही. तो कोणालाही बोलायला लाजत नाही. वयाने छोटा असलेला हर्षद हा शोमध्ये मोठ्यांसारखा वागतो. त्यामुळे त्याचे खूप लाड होतात. आज खासरेवर बघूया हर्षदविषयी माहिती..
हर्षद आहे बीड जिल्ह्यातील खेडेगावचा कोहिनुर-
हर्षद हा शोमध्ये औरंगाबादचा असल्याचे सांगण्यात येते. तो या शोसाठी आपल्या वडिलांसोबत सध्या मुंबईत राहतो. आईपासून दूर राहतो यासाठी त्याचे कौतुक केले जाते. त्याची आई शोमध्ये त्याला भेटायला देखील आली होती.
पण हर्षद हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. माजलगाव तालुक्यातील गुंजथडी गावचा आहे. त्याचे वडील नौकरीनिमित्त औरंगाबाद मध्ये स्थायिक झालेले आहेत. अवघ्या पाच वर्षीय हर्षदने माजलगाव तालुक्यासह बीड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
तालुक्याला अनेक कवी, अभिनेते असल्याची प्राश्वभूमी आहे. यामध्ये खासकरून संदीप पाठक या अभिनेत्याचे नाव घेता येईल. हर्षदचे वडील अंगद नायबळ हे औरंगाबाद मध्ये नोकरी करतात.
हर्षदची ‘हंबरून वासराले चाटती जवा गाय’ ही कविता चांगलीच गाजली होती. त्याच्या आईसाठी गायलेली हि कविता गाताना हर्षद भावुक झाला होता. तर उपस्थित लोकांच्या डोळ्यातून देखील पाणी आले होते. हर्षदचे पोवाडे देखील सर्वांची मनं जिंकत आहेत.
हर्षदला भविष्यात मोठा कलाकार होऊन माजलगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उंचवायचे आहे. गुंजथडीचा कोहिनुर हर्षदला खासरेकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
हर्षदची ‘हंबरून वासराले..’ कविता ऐकून तुमचेही डोळे पाणावतील..