‘‘उठा उठा दिवाळी आली.मोती स्नानाची वेळ झाली’’ हि गोष्ट दिवाळीचा अविभाज्य भाग बनलेली आहे. परंतु मोती साबण एवढी प्रसिद्ध का व याची सुरवात कधी झाली याची फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण खासरे वर बघूया कशी आली मोती साबण मार्केट मध्ये
पहिले आपण बघूया मोती साबण आणि दिवाळी हीच का ? याचे उत्तर नावातच आहे मोती म्हटल्यावर काहीतरी रॉयल अशी फिलिंग येते आणि मोतीने आपला दर्जा राखला आहे तो म्हणजे तिचा प्रकार ती गुलाब, चंदन अश्या सुगंधात येते. अभ्यंग स्नाना करिता यापेक्षा परफेक्ट काय असू शकते. मोतीचा आकार हि त्यांनी मोत्याप्रमाणे ठेवलेला आहे. त्यामुळे या साबनीला मोती म्हणून ओळखल्या जाते.
२०१३ साली मोतीला आपली tag line मिळाली ‘‘उठा उठा दिवाळी आली.मोती स्नानाची वेळ झाली’’ आणि सोशल मिडीयावर याच्या मिम्सने प्रचंड धुमाकूळ घातला आणि हि साबण परत चर्चेत आली. सर्वप्रथम हि साबण टाटा ऑइल मिल्सने ७०च्या दशकात या साबणाची निर्मिती केली. सुरवातीला देखील या साबणीची किंमत २५ रुपये होती. हि त्या काळाच्या मानाने खूप जास्त होती. पण मोती म्हणजे रॉयल त्यामुळे हि साबण लोकांना पसंदीस आली.
१९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनी एक झाल्या. हिंदुस्तान लिव्हरच्या मते हि साबण विशेष आहे त्यामुळे हि विशेष प्रसंगाला मोतीचाच उपयोग करा असा प्रचार करणे सुरु केले. तेव्हापासून दिवाळी दिवे, खरेदी, फटाके आणी मोती साबण हे अविभाज्य घटक बनलेले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.