बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. या रेड लाईट भागामध्ये पोलिसांनी अचानकपणे मोठी कोंबिंग ऑपरेशनची कारवाई केल्याने एकच धावपळ उडाली होती.
येथे आलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भररस्त्यावर बसवलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुधवार पेठ हि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वेश्या वस्ती आहे. या कारवाईमुळे बुधवार पेठेत येणाऱ्या तरुणांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.
उत्सुकतेपोटी आणि वेश्यागमनासाठी इथे लोकांची गर्दी असते. पण अनेकांना प्रश्न पडलाय कि नेमकी हि कारवाई का करण्यात आली. तर या कारवाईमागचे कारण आहे इथे येणाऱ्या तरुणांचे वय किती आहे व तेथील तरुणींचे देखील वय तपासण्याचा पोलिसांचा उद्देश होता.
यावेळी तेथील प्रत्येक इमारतीची पोलिसांनी झडती घेतली. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली. या परिसरात येणाऱ्या मुलींचे ओळखपत्र,पॅनकार्ड यावेळी पोलिसांनी तपासले.
बुधवार पेठेतील या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र, पॅनकार्ड नसेल त्यांना बुधवार पेठेत राहता येणार नाही. तसेच ज्यांच्याकडे सध्या ओळखपत्र नाहीत त्यांनी दोन दिवसात सर्व कागदपत्रे सादर करावी, तरच त्यांना येथे राहता येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
बुधवार पेठेतील वेश्या वस्ती-
बुधवार पेठ प्रकााशझोतत जागतीक स्तरावर आली २००८ मध्ये मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांनी बुधवार पेठला भेट दिली होती. त्यावेळी ते अनेक वेश्यांना भेटले व सुमारे तासभर इथल्या वेश्यांसोबत एड्स सारख्या रोगांवर त्यांनी चर्चा केली.
बिल गेट्स यांच्या संस्थेने वेश्यांच्या पुनरुत्थानासाठी २०० मिलीयन अमेरिकी डॉलरची मदत केली होती. वेश्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सहेली संस्थेने सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या सर्वेक्षणानुसार बुधवार पेठमध्ये ४४० कुंटणखाने असुन त्यामध्ये ७००० हुन अधिक वेश्या आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…