भारतीय लष्कर ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावत असतात. भारतात सैनिकांप्रति खूप प्रेम आणि आदर प्रत्येक भारतीयांमध्ये असतो. राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे , परकीय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे , सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत.
भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जाते.भारतीय लष्कराने पाकिस्तान ,चीन यासारख्या शेजारील देशांसोबत केलेल्या युद्धप्रमाणेच ऑपरेशन विजय ,ऑपरेशन मेघदूत यासारख्या अंतर्गत मोहिमाही आखल्या आहेत.संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शीख रेजिमेंट, गढ़वाल रेजिमेंट, मराठा रेजिमेंट आहेत. पण सध्या रेजिमेंटशी निगडित पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये भारतीय लष्करात मुस्लिम रेजिमेंट आहे का नाही यावरून प्रश्न विचारले आहेत.
त्यात आता एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात दावा केला जात आहे कि भारतीय लष्करात मुस्लिम रेजिमेंट होती. पण या रेजिमेंटच्या २० हजार सैनिकांनी १९६५ च्या युद्धात लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुस्लिम रेजिमेंट बंद केली गेली.
काय आहे यामागची सत्यता-
भारतीय लष्करात मुस्लिम प्रतिनिधीत्व हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. सैन्यात मुस्लिम रेजिमेंट नसल्याची तक्रार करण्याआधी आपण रेजिमेंट सिस्टम काय आहे याबद्दल जाणून घेउया.
रेजिमेंट सिस्टम नेमकी कशी आहे?
रेजिमेंट हा शब्द रेजिमेन या नावापासून बनला आहे. हा एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ नियमांची एक व्यवस्था असा होतो. भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. याच सेनेत पहिल्यांदा रेजिमेंट सिस्टम आली. त्यामुळे रेजिमेंट म्हंटल कि बंदूकधारी सैनिक आपल्या डोक्यात येतो.
इम्फ्रेन्टी मध्ये रेजिमेंट म्हणजे एक अशी तुकडी असते जिची एक वेगळी पद्धत असते व इतिहास असतो. प्रत्येक रेजिमेंटचा एक वेगळा झेंडा असतो, वेगळा लोगो व युनिफॉर्म देखील असतो. विशेष ट्रेनिंग या जवानांना दिलेली असते व ते आपल्या परंपरांच पालन करत असतात. तसेच एका रेजिमेंटमध्ये अनेक बटालियन असतात. त्यांना नंबर दिलेले असतात. रेजिमेंटची सुरुवात इंग्रजांनी केली होती. एखाद्या विशिष्ट समाजातील व्यक्ती बहादूर मानले जातात.
लष्करात किती मुस्लिम आहेत?
भारतीय लष्करात स्वातंत्र्यापूर्वी ३० टक्के मुस्लिम होते. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश इंडियन आर्मी विभागली गेली. ज्यामध्ये एक इंडियन आर्मी आणि दुसरी पाकिस्तानी आर्मी. भारतीय लष्करात पूर्वी असलेले मुस्लिम हे उत्तर पश्चिमेमधले होते. तो भाग पाकिस्तानमध्ये गेल्याने ते सैनिक पाकिस्तानमध्ये गेले. त्यामुळे मुस्लिम सैनिकांची संख्या कमी आहे. १९६५ मध्ये झालेल्या युद्धात खेमकरण च्या लढाईत ४ ग्रेनेडिअरचे हवलदार अब्दुल हमीद यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले.
भारतीय लष्करात मुल्सिम रेजिमेंट कधीही नव्हती. पण बटालियन मध्ये मुस्लिम सैनिकांना नेहमीच प्रतिनिधित्व मिळाले आहे. दुसऱ्या विश्वयुद्धात राजपूत रेजिमेंट लढली होती ज्यामध्ये अर्धे राजपूत सैनिक होते तर अर्धे मुस्लिम होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…