विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या पाच दिवसांमध्येच ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.
यापूर्वी त्यांच्या कंपनीने केदारनाथ या सिनेमाची निर्मिती केली होती. पण त्या सिनेमाला एवढे यश नव्हते मिळाले. आरएसव्हीपी कंपनीचा हा दुसरा सिनेमा मात्र हिट ठरला आहे. या चित्रपटामध्ये भारताच्या सूडाची कहाणी दाखवण्यात आली आहे.
‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’ सारखे अंगावर शहारे आणणारे डायलॉग या सिनेमात आहेत. विकी कौशल, यामी गौतम यांनी दमदार अभिनय या सिनेमात केला आहे.
अभिनेता विकी कौशल कडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. त्याने या सिनेमातून चाहत्यांना खुश केले आहे. सिनेमाने पाहल्याच दिवशी ८.२५ कोटींची कामे केली होती. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. उरी हा या वर्षातला पहिला सुपरहिट सिनेमा ठरला आहे.
उरी अजून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणार आहे यात काही शंका नाही. पण या सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतलेला निर्णय वाचून तर तुम्ही हा सिनेमा बघायलाच हवा. कारण उरी सिनेमाच्या निर्मात्यांनी भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानांच्या विधवांसाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सर्वच स्तरातून सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असताना या निर्णयाने यात भर पडली आहे. लष्करातील जवानांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ही मदत करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच उरीच्या टीमने भारतीय लष्करामधील काही अधिकाऱ्यांसाठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन देखील केले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…