कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक, याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 299 धावांचे लक्ष्य भारताने 6 विकेट राखून पार केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.
तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रोलिया 1-0 अशा आघाडीवर असल्याने दुसऱ्या वनडेमध्ये भारताला विजय मिळवणे आवश्यक होते. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सामन्यात धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. कारण धोनीने मागच्या सामन्यात संथ खेळी खेळली होती.
धोनीनं 96 चेंडूंत 51 धावा केल्या आणि या पराभवाला त्याची ही संथ खेळी जबाबदार असल्याची टीका झाली. पण या सामन्यात धोनीने दमदार कामगिरी केली. त्याने क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीतही दम असल्याचे सिद्ध केले. धोनीच्या दमदार खेळीने भारताचा विजय सुकर झाला.
भारताच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो कर्णधार विराट कोहली. कोहलीने त्याच्या कारकीर्दीतलं 39वं शतक झळकावून भारताला विजयपथावर नेलं. पण धोनीची 55 धावांची खेळी देखील महत्वपूर्ण ठरली. त्याने अखेरच्या षटकात मारलेला विजयी षटकार सर्व टीकाकारांना कडाडून दिलेले उत्तर होते.
धोनी जर लवकर बाद झाला असता, तर कदाचित निकाल आपल्या विरोधातही लागला असता. त्याने सुरुवातीला संथ खेळण्यास सुरुवात केली. पण नंतर त्याने जलद गतीने धावा काढल्या. धोनीचा स्ट्राईक रेट 100 च्या पुढे होता.
धोनीने धावांचा पाठलाग करतानाच्या ऍव्हरेजच्या बाबतीत विराटलाही टाकले मागे-
विराट कोहलीला भारताचा चेसमास्टर म्हणून ओळखले जाते. विराट हा चेस करताना वेगळ्याच अंदाजात खेळतो. पण धोनीहि चेस करताना मागे नसल्याचे एका आकडेवारी वरून समोर आले आहे.
धोनीने धावांचा यशस्वी पाठलाग करताना तब्बल 72 ईनिंगमध्ये 99.85 च्या सरासरीने 2696 धावा केल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये धोनी कोहलीच्या समोर आहे. कोहलीची यशस्वी पाठलाग करतानाची सरासरी 99.04 आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
धोनी म्हातारा झालाय, त्याने निवृत्ती घेतली पाहिजे म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहाच!