कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक, याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 299 धावांचे लक्ष्य भारताने 6 विकेट राखून पार केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.
तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रोलिया 1-0 अशा आघाडीवर असल्याने दुसऱ्या वनडेमध्ये भारताला विजय मिळवणे आवश्यक होते. भारताने या सामन्यात सुरुवात देखील चांगली केली होती.
मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी ऑस्ट्रेलियाला 26 धावांवर दोन धक्के दिले. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजाने अफलातून फिल्डींग करताना ही सेट जोडी तोडली.
सिडनी सामन्यातील भारताच्या पराभवाला धोनीची संथ खेळी कारणीभूत असल्याची टीका झाली. भारताचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतले असताना धोनीने रोहित शर्माच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोहितने शतक पूर्ण करतान भारताला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी हा सामना जिंकला होता.
धोनीनं 96 चेंडूंत 51 धावा केल्या आणि या पराभवाला त्याची ही संथ खेळी जबाबदार असल्याची टीका झाली. धोनी टाकलाय अशी चर्चा यामुळे चालू झाली होती. पण धोनीने अत्यंत चपळाईने स्टंपिंग करत हँड्सकोम्बला आउट केले. धोनीने चपळाईने केलेल्या स्टंपिंगने त्याच्या टीकाकारांचे तोंडच एकप्रकारे बंद केले.
बघा व्हिडीओ-
OUT! MS Dhoni stumps Peter Handscomb (20) as Ravindra Jadeja strikes! Australia 134/4 in 27.2 overs.#AUSvIND pic.twitter.com/nIYB3M2TZA
— Kaleem Tariq (@kaleemt17) January 15, 2019
Lighting Fast Stumping From MS Dhoni ! ?❤#MSDhoni #Dhoni #Fans #Cricket #Love #TeamIndia #AUSvIND #Australia #India #ODI #Legend #Adelaide #AdelaideODI #Stumping pic.twitter.com/jCBjWYBT97
— Aabhas Raj (@msdhoniaddicted) January 15, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Pahili match dhoninech jinkavli asti pan unfortunately to out jhala… Pan ya match madhe to not out rahila ani match jinkavli.. first match madhe pn Rohit barobar crucial partnership Keli ani ya match madhe pan kohli sobt.. tyachya sarkha finisher ajun milalela Nahi ugaach tond varti Karun bolu naye …laayki bgha aadhi swataachi aarshyaat