11 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात मेजर शशीधरन नायर शहीद झाले. शहीद मेजर शशिधर नायर हे दहा दिवसांपूर्वीच पत्नीला अलविदा करून कर्तव्यावर निघाले होते. त्यावेळी, मी लवकरच परत येईल असे वचन शशिधर यांनी आपल्या पत्नीला दिले होते. पण ते थेट तिरंग्यातच परतले.
मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होत्या. मेजर नायर आणि तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला होता. एका नजरेतील प्रेमापासून लग्नापर्यंतचा या दोघांच्या प्रेमविवाहाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
खासरेवर बघूया शहीद नायर आणि तृप्तींची प्रेम कहाणी-
शहीद नायर आणि तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांची लव्हस्टोरी आर्मीसह सर्वञ चर्चेचा विषय होता. आर्मी सर्कल मध्ये देखील त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमी रंगत असे. पण काळाने घात केला अन हा भारतमातेचा सुपुत्र आपल्या सर्वाना सोडून गेला.
शशीधरन आणि तृप्तीची ओळख त्यांच्या एका कॉमन मित्रामुळे झाली होती. ओळख झाल्यानंतर त्यांना प्रेम झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी, शशि 27 आणि तृप्ती 26 वर्षांची होती. दोघांनीही सहा महिन्यानंतर साखरपुडा केला. पण तेव्हा त्यांच्या प्रेमाला नजर लागली अन एक मोठे संकट त्यांच्या समोर उभे राहिले.
शशीधरन यांच्या प्रेमाची परीक्षा पाहणारा हा काळ होता. तृप्ती यांना एका गंभीर आजाराने ग्रासल्याचे उघड झाले. तृप्तीला मल्टिपल आर्टिरियोसेलेरोसिस नावाचा आजार झाला होता. मज्जारज्जूशी संबंधित या आजाराने त्यांना थेट व्हीलचेअर वर पोहचवले. भविष्यात त्या उठू बसू शकतील याची गॅरंटी नव्हती. त्यावेळी साहजिक एवढा मोठा आजार म्हणल्यावर लग्न मोडले असते.
मात्र शहीद मेजर शशीधरन नायर यांनी ठरलेलं लग्न न मोडता, त्यांच्याशीच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा संसार ३ वर्षांपासून आनंदात चालू होता. शशीधरन देशासाठी हुतात्मा झाले आणि संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून गेले.
मूळच्या तेलुगू असलेल्या तृप्ती या पिंपरी चिंचवडला स्थायिक झाल्या होत्या. तर शहीद नायर हे मूळचे केरळचे रहिवासी होते. सध्या ते पुण्यातील खडकवासला परिसरात राहयचे. नायर यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. तर 2007 साली देहरादूनच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून त्यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…