सोशल मीडियात काहीही वायरल होऊ शकते परंतु या वेळेस खूप वेगळा प्रकार बघयला मिळाला आहे. केली जेनर हिच्या नावाने असणारा वर्ल्ड रेकोर्ड एका अंड्याच्या फोटोने तोडला आहे. ह्या अंड्याला तब्बल ४ करोड लाईक आणि ५५लाखाहून अधिक फोलोवर फक्त १२ दिवसात आले आहे. चला बघूया कशामुळे झाला हा फोटो वायरल..
केली जेनर हिच्या लहान बाळाचा फोटो हा १.८ करोड लाईक घेऊन इंस्टावरील सर्वात वायरल फोटो हा रेकॉर्ड घेऊन होता. परंतु या account ने सर्वाला मागे टाकून तब्बल ४ करोड लाईक घेतलेल्या आहे. world_record_Egg नावाने बनविलेले या अकाऊटवर फक्त एकच पोस्ट करण्यात आली आहे. आणि हि पोस्ट भयंकर वायरल झाली आहे.
लंडन येथून सुरु झालेले हे खाते आहे. तो अकाऊट चालविणारा मुलगा सांगतो कि ४ जानेवरीला त्याला हि आयडिया २०१८ मधील सर्वात वायरल पोस्ट नावाचे आर्टिकल वाचताना आली. सेलिब्रिटीनाच काय लाईक कोणीही घेऊ शकतो हे त्याला दाखवायचे होते. पहिल्या दिवशी फक्त १०,००० लाईक आल्या होत्या त्यानंतर हे अंडे वायरल होण्यास सुरवात झाली.
१० लाखांपेक्षा अधिक लोकांनी या अंड्यावर कमेंट देखील केलेल्या आहे. या वायरल फोटो नंतर केली जेनर हिने स्वतः एक व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यामध्ये ती अंडे रस्त्यवर फेकताना दिसत आहे.
आता हे अंडे एवढे प्रसिद्ध झाले आहे कि इन्स्टा वर पालक, ब्रेड, सिगरेट, आलू इत्यादी देखील दाखल झालेले आहे. आता बघूया हा रेकोर्ड कोण तोडणार खाली फोटोत आपण अंड्याच्या लाईक बघू शकता..
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा व आमचे पेज शेअर करायला विसरू नका..