नवनीत राणा कौर यांच्या बद्दल महाराष्ट्रात नेहमीच एक उत्सुकता राहिलेली आहे.त्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांची चर्चा झाली होती. नवनीत कौर या दाक्षिणात्य अभिनेत्री असून त्यांचे चित्रपट दक्षिण भारतात चालले आहेत.
अमरावती येथे युवा स्वाभिमान महोत्सवात मकर संक्रांत निमित्ताने महिला मेळावा आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातील त्यांचा एक उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांनी हजेरी लावली होती.
यावेळी नवनीत कौर राणा यांनी दोन उखाणे घेतले ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्या यावेळी देखील लोकसभेची तयारी करत आहेत. त्यांनी आपल्या उखाण्यांतून लोकांना साथ देण्यासाठी विनंती देखील केली. यावेळी नवनीत राणा यांनी “निळया निळ्या आकाशात लुकलुकतात तारे,रवीजींचे नाव घेते मात्र, लक्ष द्या सारे” हा एक उखाणा घेतला.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…