ही आहे मच्छिंद्रखेड जि. बुलढाणा इथली वैष्णवी.. काही वर्षांपूर्वी एका अपघातात स्वताःचे आई वडील गमावलेली ही दुर्भाग्यी मुलगी..
एकदा संग्रामपुरच्या दौर्यावर असताना रविकांतभाऊंनी त्यांच्या घरी भेट दिली. सगळी दुर्दैवी परिस्थिती पाहुन रविभाऊंना गहिरवुन आलं. त्यांनी वैष्णवीला व तिच्या इतर दोन भावंडांना दत्तक घेन्याचा निर्णय घेतला. त्यांचं पालनपोषण चांगल्या प्रकारे केलं. त्यांना सर्व सुखसुविधा दिल्या.
आपण अनाथ आहोत आपल्याला आईवडील नाही याची किंचीत ही जाणिव त्यांना होवु दिली नाही. त्यांची उणिव जाणवु दिली नाही. स्वतःच्या लेकरांप्रमाणं माया अन् जिव्हाळा त्यांनी दिला.
रविकांतभाऊंची ही कन्या नगर येथिल पब्लिक स्कुल मध्ये इयत्ता दहावीला शिकत आहे. ती शाळेत प्रचंड हुशार आहे. गणितात तिला आऊट ऑफ मार्क्स मिळतात हे शिक्षक जेव्हा कौतुकाने सांगत होते तेव्हा अनेक प्रस्थापित राजकारण्यांना रडवनारा रविकांतभाऊ लेकीच्या कौतुकाने मी रडताना पाहिला.
आज आपल्या या बहादुर मुलीला भेटण्यासाठी तिचे लाडके बाबा अर्थात रविकांतभाऊ आले होते. अचानक आलेल्या आपल्या बाबांना पाहुन तिच्या अश्रुंचा बांध फुटला अन् ती “पप्पा तुम्ही…!” असं म्हणत ती आनंदुनी गेली.
यावेळी घडलेला एक प्रसंग असा की.. तिला भाऊंच्या एका मित्राने खाऊसाठी दोन हजार रूपये देवू केले परंतु वैष्णवीने विनम्रपणे नकार देत व थँक्स म्हणत ते घेतले नाहीत.. “मी फक्त पप्पांकडुनंच पैसे घेते,दुसर्या कुनाकडुन घेत नाही” असे ती म्हणाली.. माझे वडिल राजकीय नेते आहेत हे ती सांगतं नाही मात्र मी रविकांत तुपकरांची कन्या आहे हे ती ठासुन सांगते असे शिक्षकांनी आम्हाला सांगितले. तिची ही परिपक्वता पाहुन आम्हालाही कौतुक वाटले.
वैष्णवीला भेटल्यानंतर कायम भल्याभल्यांचे धाबं दणाणवनारा अन् मुलुख मैदान तोफ म्हणुन विरोधकांची भंबेरी उडवनार्या रविकांतभाऊंच हे वेगळंच रूप आज आम्ही अनुभवलं… ह्रदयस्पर्शी क्षणाचं साक्षीदार होन्याचं भाग्य आम्हाला लाभलं. भेट झाल्यानंतर बापलेकींच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रु पाहुन आमच्याही पापण्यांच्या कडा पाणावल्या. जणु तो सोहळाचं असावा असा सुवर्णक्षण आम्हाला याची देही याची डोळा अनुभवता आला. आपल्या या लाडक्या लेकीला आय.ए.स अधिकारी बनवन्याचं स्वप्न भाऊंनी उराशी बाळगलंय. हे सगळं खरोखरच सुखद आहे.
माणुसकी हरवत चाललेल्या या नापिक शिवारात हे नवं अंकुरंच उगवलंय. तुपकर साहेबांनी या सोबत आत्महत्याग्रस्तांची आणखी बरीच मुलं दत्तक घेतं त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचललीय. बॅनरबाजी, फोटोग्राफी, चमकोगिरी यांपेक्षा असं विधायक कार्य करन्याचं शिवधनुष्य या स्वाभिमानी वाघानं उचललंय. हे सर्व केवळ जपण्याजोगंच नव्हे तर वाढवन्यासारखंच आहे. शेवटी इतकंच म्हणेल, मोडलेल्या माणसांचे, दुखः ओले झेलताना.. त्या अनाथांच्या उशाला, दिप लावु झोपताना.. कोनती ना जात ज्यांची, कोनता ना धर्म ज्यांचा.. दुखः भिजले दोन अश्रु, माणसांचे माणसांना…
#माणुसकी_हाच_धर्म….
रणजित बागल..
गादेगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर
मो. 8412800833