जगभरात दहशत पसरवणारे जर स्वतःचा मृत्यूला घाबरत असतील तर याचा अर्थ त्यांना पण भीती वाटतेच. एक एकटाच जिगरबाज व्यक्ती पूर्ण आयसिसला घाबरवत आहे. तुम्हाला प्रश्न पडेल कोण आहे हा व्यक्ती आणि का जगातील सर्वात घातक संघटना त्याला घाबरत आहे?
ती व्यक्ती आहे अयुब फलेह उर्फ अबू अजरेल ज्याला लोक ‘मौत का फरिस्था’ म्हणून ओळखतात. आयसिसचे आतंकवादी सुद्धा त्याला याच नावाने ओळखू लागले आहेत. आयसिस भलेही इराक आणि सीरिया मध्ये प्रचंड दहशत पसरवत असला तरी अबू अजरेल त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहेत. अबू अजरेल आयसिसच्या आतंकवाद्यांसाठी चलता फिरता मृत्यू आहे. यामुळेच आयसिस चे आतंकवादी त्याला प्रचंड घाबरतात. तो इराक मध्ये आयसिस साठी दहशतीचे दुसरं नाव बनला आहे.
छातीवर बुलेट प्रूफ जॅकेट, एका हातात असॉल्ट रायफल तर दुसऱ्या हातात कुऱ्हाड आणि निशाण्यावर आयसिसचे आतंकवादी. अबू अजरेल ला काही याच अंदाजामध्ये इराकमधील विविध शहरात आयसिसच्या आतंकवाद्याविरोधात लढताना पाहिले जाऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार ४० वर्षाचा अयुब फलेह इराणचा नागरिक आहे. तो तिथं एका युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर होता. एवढेच नव्हे तर अबू अजरेल आपल्या देशात तायक्वांदो चॅम्पियन सुद्धा राहिला आहे. इराकमध्ये आयसिसच्या आतंकवाद्यांकडून केला जात असलेला मृत्यूचा खेळ बघून त्याने आपली नोकरी सोडली आणि तो इमाम अली ब्रिगेड मध्ये सामील झाला. इमाम अली ब्रिगेड हा शिया मिलीशीया ग्रुप आहे जो इराकमध्ये आयसिसच्या विरोधात लढत आहे. अबू अजरेल या ग्रुपचा कमांडर बनला. लोकांचा दावा आहे की त्याने एकट्यानेच आतापर्यंत १५०० आयसिसच्या आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
अबू अजरेल एक नारा बुलंद करतो. ‘इल्लाह तालिन’ म्हणजेच धुळीशीवाय काहीच नाही उरणार. त्याने शपथ घेतली आहे की जोपर्यंत तो इराकमध्ये आयसिसच्या आतंकवाद्यांना कंठस्नान नाही घालणार तो पर्यंत तो आयसिसच्या विरोधात लढत राहणार आहे.
फक्त इराकमध्येच नव्हे तर जगभरातील लोकं अबू अजरेलच्या हिमतीचे फॅन बनले आहेत. अबू अजरेल च्या फॅन्सनी त्याच्या नावाने फेसबुकवर अनेक क्लब कम्युनिटी आणि पेज बनवले आहेत, ज्यावर अबू अजरेल च्या बहादुरीचे किस्से पोस्ट केलेले आहेत. अबू अजरेल हा फक्त खाडीच्या देशातच नव्हे तर इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेत सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…