सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करायला हवे. तुम्हाला ज्या कोणत्या क्षेत्रात रुची आहे किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्या क्षेत्राविषयी पूर्ण माहिती ठेवा. यासोबतच तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तयारीला लागा. जर तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न माहिती असणे खूप महत्वाचे आहे. कारण प्रत्येक परीक्षेचे पॅटर्न वेगवेगळे असतात.
यासाठी परीक्षेची तयारी सुरू करण्याच्या अगोदर परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या आणि परीक्षेच्या पॅटर्न नुसार अभ्यास करा. तुम्ही जर सरकारी नोकरी साठी परीक्षेची तयारी करत असाल तर आज आम्ही खासरेवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही असे प्रश्न-उत्तर जे तुम्हाला माहिती असणे खूप महत्वपुर्ण आहे. हे तुम्हाला तुमची परीक्षा पास करण्यासाठी मदत करतील.
1. प्रश्न- 1829 मध्ये सती प्रथेच्या निर्मूलनासाठी कोण कारणीभूत ठरले? उत्तर- लॉर्ड बैंटिक 2. प्रश्न- गुजरात आणि महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर- गुजरात आणि महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा लेला जातो. 3. प्रश्न- जगातील अशी कुठली जागा आहे जिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते? उत्तर- अंटार्क्टिका मध्ये सहा महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते.
4. प्रश्न- गांधीजींनी कुमाऊं ची यात्रा कधी केली होती? उत्तर- गांधीजींनी कुमाऊं ची यात्रा सर्वप्रथम जून 1929 मध्ये केली होती. 5. प्रश्न- कार्डमम डोंगरे कोणत्या सीमेवर आहेत? उत्तर- कार्डमम डोंगरे केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर आहेत.
6. प्रश्न- असे कोणते अधिकार आहेत जे भारतीय संविधान नुसार संविधानातील अधिकार आहेत पण मूलभूत अधिकार नाहीत? उत्तर- संपत्तीचे अधिकार 7. प्रश्न- दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजींनी प्रथम सत्याग्रह कुठे चालवला? उत्तर- चंपारण 8. प्रश्न- भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण सर्वोच्च आहे? उत्तर- केरळ 9. प्रश्न- चौथा खांब कशाचे प्रतीक आहे? उत्तर- वर्तमानपत्र 10. प्रश्न- मुगल शासनात मनसबदारी प्रणालीचा कोणाकडून करण्यात आले? उत्तर- अकबर 11. प्रश्न- भारतात हडप्पाचे उगम स्थान कुठे आहे? उत्तर- ढोलवीरा
12. प्रश्न- सुत्त, विनय आणि अभिधम्म यामध्ये ‘यमक’ बुद्ध ‘पिटक’ कशाशी संबंधित आहे? उत्तर- अभिधम्म 13. कोणत्या चिनी तिर्थयात्रीने 6 वय शतकात भारत दर्शन केले? उत्तर- सुंग युन 14. प्रश्न- चालुक्य शासक पुलकेशीनच्या हर्षावर विजयाचे वर्ष कोणते होते? उत्तर- 612 ई.
15. प्रश्न- भारतीय महासागरात चुंबकीय दिशासुचकचा प्रयोगाची सुरवातीची सूचना कोणाकडून करण्यात आली. उत्तर- सदरुद्दीन मुहम्मद औफी 16. अति कट्टरपंथी सुफी संप्रदाय कोण होत? उत्तर- नक्षबंदी.
17. प्रश्न- शुद्ध चांदीच्या रुपयांचा शोध कोणी लावला? उत्तर- शेरशाह 18. प्रश्न- बघत रियासातचा ब्रिटिश विलय कधी झाला? उत्तर- 1850 ई. 19. प्रश्न- सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर आणि कमलादेवी चटोप्पाध्याय यापैकी कोणी गांधीजीमच्या मिठाच्या आंदोलनात सहभाग घेतला होता? उत्तर- सरोजिनी नायडू
20. प्रश्न- ‘पाकिस्तान प्रस्ताव’ ची रुपरेषा कोणी तयार केली होती? उत्तर- सिकंदर हयात खान 21. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटिश सम्राट कोण होता? उत्तर- जॉर्ज षष्ठम
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…