वाचून तुम्हाला धक्का बसेल कि असा हि बाजार राहतो का परंतु हि गोष्ट सत्य आहे. भारतातील मध्य प्रदेश मध्ये भोपाळ पासून १५ किमी अंतरावर ईंटखेड़ी येथे हा बाजार भरतो. १४ लोकांनी १९४४ साली या बाजाराची सुरवात करण्यात आली होती आणि बघता बघता आता दरवर्षी १४ लाख येथे येतात.
इज्तिमा हा अरबी भाषेतील शब्द आहे याचा अर्थ होतो एकत्र होणे किंवा जमा होणे. नवाबाच्या काळात सुरु झालेला हा इज्तिमा आता संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. यामध्ये गरिबांना मदत म्हणून हा बाजार भरविण्यात येतो. आणि विशेष म्हणजे येथे येणारा सर्व माल हा प्रदेशातून बोलवला जातो. आणि कमी किंमतीमध्ये विकण्यात येतो.
भोपाळ येथे भरणारा हा इज्तिमा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना इज्तिमा आहे. रशिया, फ्रांस, कजाकिस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, जाम्बिया, दक्षिण अफ्रीका, केनिया, इराक, सऊदी अरब, इथियोपिया,यमन, सोमालिया, थाईलैंड, तुर्की आणि श्रीलंका येथून हजारो लोक या तीन दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होतात.
इज्तिमा येणार तेव्हाच कपडे खरेदी करायचे असे या भागातील लोक बोलतात. या बाजारास आलमी इज्तिमा देखील म्हणतात आलम म्हणजे जग असा अर्थ होतो. मौलाना मिस्कीन यांनी या बाजाराची सुरवात केली होती. सुरवातीस ताजुल मस्जिद परिसरात भरणारा हा इज्तिमा जागा अपुरी पडत असल्याने इटखेडी या भागात हलविण्यात आला.
खवैया करिता सुध्दा हा इज्तिमा एक मेजवानी आहे इथे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीस असतात. स्वस्त वस्तू मिळत असल्याने दर वर्षी या ठिकाणी गर्दी वाढत आहे. या वर्षी तब्बल २० लाख लोक या कार्यक्रमास आले असे सांगण्यात येत आहे. मुस्लीम समाज करिता आता येथे सामुहिक विवाह मेळावे देखील इथे आयोजित करण्यात येत आहे.
खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये आपण हा बाजार बघू शकता..
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा व आमचे पेज शेअर करायला विसरू नका..