youtube वर चैनल चालविणाऱ्या युजर्सन youtube profit चा हिस्सा देतो हे सर्वाना माहिती आहे. भारतात अनेक लोक या धंद्यात आहे. परंतु काही लोक ह्या सर्वापेक्षा हटके चैनल बनवितात. असाच एक मुलगा आज खासरेवर बघणार आहो. त्याचे काम आहे youtube वर खेळण्याचे परीक्षण करणे. आणि सध्या तो youtube वर सर्वात लोकप्रिय आहे चला बघूया खासरेवर कसा कमावतो एवढे पैसे हा छोटा मुलगा…
ह्या मुलाचे नाव आहे रयान आणि youtubeवर आपण रयानचे video ‘Ryan ToysReview’ या लोकप्रिय चैनलवर बघू शकता. मूर्ती लहान पण कीर्ती महान हे खर आहे. हा मुलगा महिन्याला करोडो कमवतो तोही फक्त विडीओ बनवून. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल कि या मुलाचे सध्या वय फक्त ६ वर्ष आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात रयान वर्षाला ११ मिलियन डॉलर कमवतो. म्हणजे भारतीय रुपयात हि कमाई ७० करोड पेक्षाही अधिक आहे.
अमेरिकेत राहणारा रयान सर्वात कमी वयाचा करोडपती youtube स्टार आहे. RyanToysReview नावाने तो युट्युब चैनल चालवतो आणि त्याच्या प्रत्येक विडीओला लाखो हिट्स आणि करोडो views असतात. हे चैनल चालवायला त्याचे कुटुंब त्याला मदत करते त्यामुळे तो हा सर्व व्याप सांभाळू शकतो. सुरवातीला रयानच्या घरच्यांनी त्याचे वेगवेगळ्या खेळण्या सोबत खेळताना विडीओ त्याच्या चैनलवर अपलोड करणे सुरु केले. विडीओचा प्रतिसाद बघता त्याच्या घरच्यांनी रयानला खेळण्याचे परीक्षण करायला सांगितले आणि आता तो सर्वात प्रसिद्ध खेळण्याचे review देणारा आहे.
रयान ला लहानपणापासून खेळणे आवडत होते नवनवीन खेळण्याचा तो हट्ट करत असे. तो युट्युबवर हे सर्व खेळणे बघत होता. एक दिवस त्याने वडिलाला म्हटले कि मलाही माझे खेळणे युट्युब वर दाखवायचे आहे. तेव्हापासून सुरु झाला रयानचा हा भन्नाट प्रवास. रयान युट्युबवर एवढा प्रसिध्द आहे कि त्याच्या चैनलला तब्बल १ कोटी पेक्षाही अधिक सबस्क्रायबर आहे. त्याने आत्तापर्यंत ८७१ पेक्षा अधिक विडीओ बनविले आहे. RyanToysReview हे युट्युबवरील सर्वात लोकप्रिय चैनल पैकी एक चैनल आहे.
रयानचे आईवडील हे चैनल चालवतात. त्याची आई हि शिक्षिका आहे मुलाच्या प्रचंड व्यापामुळे त्यांनी नौकरी सोडली आहे. रयानला कल्पना देखील नाही त्याचे काम किती मोठे आहे. forbes ने मागे सर्वाधिक कमाई करणारे युट्युबरची यादी प्रसिद्ध केली होती त्यामध्ये त्याची वार्षिक कमाई ११ मिलियन डॉलर होती. मागील वर्षी The Verge ने रयानच्या युट्युब चैनल सोबत एक प्रोफाईल बनविले होते त्यामध्ये रयानचे विडीओ ते रिलीज करत असे.
जुलै २०१५ पासून रयान च्या चैनल ने जोर पकडला त्याचा “GIANT EGG SURPRISE” हा विडीयो खूप वायरल झाला. सध्या त्या विडीओला १०० कोटीपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. असा आहे हा रयान युट्युबचा स्टार…
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…