बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी बाळंतपणात आई व जन्मणारे मूल याना त्रास होऊ शकतो. दर हजार प्रसूतिमागे 3-4 माता मृत्युमुखी पडतात व अनेक आजारी पडतात. अवघड बाळंतपणात बाळालाही इजा होण्याची शक्यता असते. म्हणूनच बाळंतपणात आई व बाळाची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. बाळंतपण व्यवस्थित पार पडावे यासाठी गरोदरपणापासुनच काळजी घ्यायला हवी.
साधारणपणे दिवस पूर्ण भरले की बाळंतपण होते. पण सध्याच्या काळात अनेक दवाखान्यात पैशाची लूट डॉक्टर करत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. बाळंतपणाच्या वेळी कळा सुरू झाल्यावर वैद्यकीय मदतीची गरज लागते पण दवाखान्यात डॉक्टर आता अनेक वैद्यकीय चाचण्या करायला सांगतात. प्रसूती शास्त्रकियेबाबतही हेच पाहायला मिळत आहे.
सिझेरियन प्रसूती विषयी दवाखान्याची सत्यता-
आजकाल सिझेरियन प्रसूती सर्रासपणे केली जाते. दवाखान्यात विविध कारणे जसे की मातेच्या जीवाला धोका आहे, बाळाच्या जीवाला धोका आहे, बाळाच्या गळ्याला नाळ अडकली गेलीये आणि बाळाला श्वास घेण्यास त्रास होतोय असे कारणे पुढे केले जातात. एकप्रकारे भीती घालून सिझेरियन प्रसूती करण्याची गरज डॉक्टर भासवून देतात. खाजगी रुग्णालयात हा प्रकार नित्याचाच झाला आहे. सिझेरियन प्रसूती करून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट करणाऱ्या दवाखान्यावर शासनानं पाऊले उचलायला हवे.
कोणत्या परिस्थितीत करावे लागते सिझेरियन-
सिझेरियन करण्याची गरज प्रत्येक मातेच्या बाळंतपणात पडते असे नाही. बाळाचे डोके मोठे असेल आणि जन्ममार्ग लहान असल्यास, मूल अडवेतिडवे असल्यास, आईचा रक्तदाब वाढल्यास, मधुमेह असल्यास, गर्भाशयाच्या तोंडावर गाठ असल्यास किंवा नाळ बाळाच्या मानेभोवती किंवा खाली सरकल्यास बाळंतपणात अडचणी येतात व त्यासाठी सिझेरियन करावे लागते.
सिझेरियन म्हणजे पोट व गर्भाशयात छेद देऊन वरून मूल काढले जाते. आई व बाळाची यामुळे सुखरूप सुटका होऊ शकते. सिझेरियन म्हणजे योनीमार्गातून बाळ बाहेर ना आणता ओटीपोटावर छेद देऊन बाळ बाहेर काढणे.सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर 24 तास प्रचंड वेदना होतात. त्यासाठी झोपेच्या व वेदना कमी करण्याच्या गोळ्या-औषधी देऊन वेदना कमी केल्या जातात. दुसऱ्या दिवशी स्त्री उठून बसू शकते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…