भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय आज मिळवला. ऑस्ट्रेलिया मध्ये तब्बल 72 वर्षांनी भारताने मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारत हा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ बनला आहे.
भारतीय संघ 3-1 ने मालिका जिंकेल अशी आशा होती. पण पावसाने भारताच्या आशांवर पाणी फेरले. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली.
कोहलीच्या नेतृत्वात तब्बल 72 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका विजयाचा भीम पराक्रम केला आहे.
सिडनी कसोटीत सामन्याच्या 5 व्या दिवशी पावसामुळे खेळ सुरूच होऊ शकला नाही. उपहारानंतरही पावसाने विश्रांती न घेतल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित म्हणून जाहीर केला आणि भारतीय संघाने 4 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
या विजयानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. टीम इंडियाचा ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन केलेला व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
भारतीय संघाने मेरे देश की धरती या गाण्यावर डान्स करत चांगलंच जोरदार सेलिब्रेशन केले आहे. बघा व्हिडीओ-