Sunday, March 26, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

सकाळी संडासला खूप वेळ लागतो? हे उपाय करून बघा…

khaasre by khaasre
January 7, 2019
in बातम्या
0
सकाळी संडासला खूप वेळ लागतो? हे उपाय करून बघा…

नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून गंभीर आजार संभवू शकतात. बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय आज खासरे वर बघूया..

बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते. मांसाहार, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरोध किंवा बद्धकोष्ठता बळावते. कमी पाणी पिणे, चुकीच्या खाण्याच्या पध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंबवलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते. शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औषधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते. तंम्बाखु, दारू या व्यसनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते.

एरंडेल तेल एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल.

अंजीर अंजीर तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. आळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा गरम पाण्यासोबत घेऊ शकता.

लिंबू आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी अनशन पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते.

संत्र संत्र हे व्हिटामिन ‘ सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते . सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.. संत्री रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत.

मनुका मनुकादेखील रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते . रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो. गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

पालक पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुजीवीत करण्यास मदत करतो. 100 मिली पालक रस व पाणी समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो . तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासावरदेखील पालक हितावह आहे.

त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे आवळा , हरडा व बेहडा या तीन फळांपासून बनवलेले असते . हे चूर्ण रेचक असून त्यामुळे तुमचे पचन नियमित व शौचास सुलभ होण्यास मदत होते. चमचाभर त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत अथवा मधासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना घेतल्यास बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो.

पेरू पेरूमध्ये पाचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेवर पेरू अत्यंत फायदेशीर ठरतो .पेरूमध्ये व्हिटामीन बी व सी अधिक आहेत. पेरूतील गरामध्ये विद्राव्य (soluble ) फायबर असतात तर बियांमध्ये अद्राव्य (insoluble ) फायबर असतात. त्यामुळे पोट साफ होऊन भूकवाढीसाठी पेरूचे सेवन हितावह आहे.

बियांचे मिश्रण २-३ सूर्यफूलांच्या बिया, थोडे आळशीचे दाणे, तिळाच्या बिया व बदाम यांची पूड करून नियमित घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सलाड किंवा नाश्त्याला धान्यात ही पूड एकत्र करून किमान दोन आठवडे खाल्याने निश्चित आराम मिळतो. यामधून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाहीत तर त्यामुळे आतड्यांचा मार्ग देखील पुनरुज्जीवित होतो.

हि आरोग्यदायी माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Loading...
Previous Post

जयपूरच्या या पॅलेस मध्ये आहेत सोन्याचे दरवाजे, चांदीचे पलंग आणि सोन्याचे नळ…

Next Post

इथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान

Next Post
इथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान

इथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In