राजस्थान राजवाडे आणि मोठमोठ्या हवेली साठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. इथली भव्यता अशी आहे की एकदा बघितले की नजर हटवायची इच्छा होत नाही. राजस्थान मध्ये असे अनेक भवन आणि राजवाडे बघायला मिळतात जे की आपल्या भव्यदिव्यतेमूळे रेकॉर्ड मध्ये नाव कोरलेले आहेत. जयपूरच्या भव्यदिव्य पॅलेस मधील एक नाव म्हणजे राज पॅलेस.
राज पॅलेस आपल्या भव्यदिव्यते मूळे पूर्ण जगभरात चर्चेचा विषय राहिलेला आहे. आता सध्या राज पॅलेस पुन्हा चर्चेत आला आहे तो म्हणजे तिथे एक दिवसासाठी घेतल्या जाणाऱ्या भाड्यामुळे. रायपुरच्या या भव्य पॅलेस मध्ये एक भव्य सुट तयार करण्यात येत आहे ज्याचे भाडे 48 लाख रुपये प्रतिदिन असणार आहे. आता सध्या हॉटेलमध्ये सर्वात महागड्या सुटचे भाडे 7 लाख 20 हजार रुपये प्रतिदिन आहे. या सुटमध्ये चार अपार्टमेंट आणि एक पर्सनल एलिवेटर सुद्धा आहे. आज आपण खासरेवर जाणून घेणार आहोत याच भव्यदिव्य राज पॅलेसविषयी काही नाविन्यपूर्ण गोष्टी.
पॅलेसमध्ये आहेत सोन्याचे नळ आणि चांदीचे बेड-
राज पॅलेसच्या बेडरूम मध्ये चांदीचे बेड आणि रेस्ट रम मध्ये फेरारी कंपनीने बनवलेले सोन्याचे खास नळ लावण्यात आले आहेत. भींतीवर सुद्धा गोल्ड वर्क करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इथे डायनिंग एरिया पासून किचन सर्व काही पर्सनलाईज्ड आहे. पॅलेसमध्ये पाहुणे पोहचल्या नंतर तिथे शाही रुक्काचे वाचन केले जाते, एवढेच नव्हे तर पाहुण्यांना शाही फील यावा यासाठी स्वागतासाठी हत्ती घोडे असतात आणि रेड कार्पेट ने दिमाखात स्वागत केले जाते. इथे खास स्वागतासाठी 25 सदस्यांची रक टीम तैनात असते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्पेशल शैम्पेनची अंघोळच दिली जाते.
पॅलेसला मिळाला आहे बेस्ट लिडिंग हेरिटेजचा अवॉर्ड-
जयपूरच्या राज पॅलेस हॉटेलने 2012 साली जगातील लिडिंग बेस्ट हेरिटेज हॉटेलचा सन्मान पटकावला आहे. हॉटेलला हा अवॉर्ड 12 डिसेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ग्रँड फायनल गाला सेरेमनी मध्ये देण्यात आला. वर्ल्ड ट्रॅव्हल अवार्डच्या कॅटेगरीत या हॉटेलने ऑस्कर ऑफ दि ग्लोबल ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्रीचा अवॉर्ड जिंकला आहे. वर्ल्ड ट्रेंड अवॉर्ड कडून 2011 साली हॉटेलला बेस्ट हेरिटेज हॉटेल साठी वोटिंग केली गेली.
300 वर्षे जुना आहे हा राजवाडा-
या राजवाड्यात जिम, स्विमिंग पूल, कॉफी शॉप आणि प्रत्येक खोलीला जोडलेले एक छोटे म्युझिअम सुद्धा आहे. हॉटेलच्या 2 खोल्या या एकसारख्या नाहीयेत. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन काही तरी बघायला मिळेल आणि प्रत्येक मजल्यावर अंगण सुद्धा आहे. प्रत्येक खोलीमध्ये सूर्याचा प्रकाश येण्यासाठी पुरेपुर नियोजन केलेले आहे. या पॅलेसची निर्मिती 1727 मध्ये राजपूत च्या छोट्याशा रियासत चोमुच्या राजाने केली होती. 300 वर्षांनंतर सुद्धा त्याच दिमाखात उभा आहे हा पॅलेस.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…