फेसबुक ही जगातील सर्वात प्रसिध्द सोशल नेटवर्किंग साईटपैकी एक साईट आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही आपल्या परिवारातील सदस्य, मित्र आणि अनेक लोकांशी जोडलेले राहू शकता. आपण सर्व जाणतो की फेसबुकची सुरुवात मार्क झुकरबर्ग याने केली होती.
पण प्रत्यक्षात मात्र फेसबुकच्या शोधाची कहाणी खूप वेगळी आहे. फेसबुकचा शोध लावणारा खरा मालक हा मार्क झुकरबर्ग नसून एक भारतीय व्यक्ती आहे. चला तर मग आज खासरेवर जाणून घेऊया फेसबुकच्या शोधाची खरी कहाणी…
दिव्य नरेंद्र हे नाव खूप कमी भारतीयांना माहिती असेल. ते एक अमेरिकेचे नागरिक आहेत पण ते मूळचे भारतीय आहेत. त्यांचे आईवडील अडचणीच्या काळात भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. दिव्य नरेंद्र यांचं शिक्षण बालपण अमेरिकेतच झाले. दिव्य नरेंद्र यांचे आई वडील हे पेशाने डॉक्टर आहेत.स्वतासारखं दिव्यला सुद्धा डॉक्टरच करावं असं त्यांचं स्वप्न होतं. पण दिव्यला काही हे मान्य नव्हते.
त्यांच्यामध्ये इंटरप्रिन्योर बनण्याची जिद्द होती, त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षाला यशही आले, कारण जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकची आयडिया ही त्यांची होती. लन त्यांना हे सिद्ध करण्यासाठी 2008 पर्यंत कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी लागली.
फेसबुकची खरी आयडिया ही दिव्य, त्याचा मित्र विंकलवास आणि इतर मित्रांची होती. पण मार्क झुकरबर्गने यामध्ये काही बदल करून ही आयडिया चोरली. दिव्यने 2004 मध्ये अमेरिकेत एका न्यायालयात मार्क विरुद्ध कायदेशीर केस दाखल केली. त्यांना यामध्ये यश आले, न्यायालयात सिद्ध झाले की फेसबुकची खरी आयडिया ही दिव्य आणि त्याच्या इतर मित्रांचीच आहे.
यासाठी न्यायालयाने मार्क झुकरबर्ग याला 650 लाख डॉलर्सचा दंड ठोठावला. परंतु दिव्य याने समाधानी नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की शेअर बाजारात जशी फेसबुकच्या शेअरची किंमत आहे त्याप्रकारे त्यांना पैसे नाही मिळाले.
दिव्य यांनी पुन्हा एकदा न्यायालयात याविरुद्ध दाद मागितली मात्र न्यायालयात यावेळी दिव्य याना हार पत्करावी लागली. मात्र कोर्टाने 2008 सालीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. फेसबुकचा मालक आणि शोध लावणारा व्यक्ती म्हणून भलेही दिव्य याला कोणी ओळखत नसेल पण जेव्हा फेसबुकच्या शोधाची कहाणी लिहिली जाईल तेव्हा दिव्य यांची नक्कीच आठवण काढली जाईल.
फेसबुकच्या शोधाची खरी कहाणी-
फेसबुकचा शोध हार्वर्ड कनेक्शन सोशल साईटच्या निर्मिती प्रक्रियाच्या वेळी झाला. दिव्य हार्वर्ड कनेक्शन प्रोजेक्टवर खूप पुढेपर्यंत पोहचला होते. त्यानंतर बऱ्याच अवधीनंतर मार्क हा त्या प्रोजेक्टमध्ये सामील झाला होता. मार्कने यानंतर या प्रोजेक्टवर ताबा मिळवला आणि फेसबुक या नावाने एक डोमेन रजिस्टर करून त्याने तो जगासमोर आणला. दिव्य आज अमेरिकन बिझनेसमन म्हणून ओळखले जातात. 18 मार्च 1982 साली जन्मलेल्या दिव्य यांचे शिक्षण हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून झालेले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…