कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” या कार्यक्रमातील अनेक जोरदार परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. या शोच्या टीआरपी मध्ये भरघोष वाढ झालेली दिसत आहे. छोट्या बच्चे कंपनीने आपल्या सुरांनी सर्वाना भुरळ घातली आहे.
या शो मधील मागच्या आठवड्यात हर्षद नायबळने गायलेलं ‘हंबरून वासराले..’ गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. हर्षद हा या शो मध्ये मॉनिटर म्हणून ओळखला जातो.
हर्षदने सर्वाना आपल्या आवाजाने भुरळ घातली आहे. हर्षदचा एक नवीन व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. यामध्ये हर्षदने गायलेला प्रतापगडाच्या पायथ्याशी खान हा पोवाडा सर्वाना फार आवडला आहे.
बघा हर्षदचा हा खास पोवाडा-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…