महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आदर आणि अभिमान शिकवण्याची गरजच पडत नाही. प्रत्येकाला महाराजांबद्दल प्रचंड आदर आणि अभिमान असतो.
सध्या झी मराठीवर चालू असलेली स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सर्वाना पुन्हा एकदा इतिहास अनुभवायला लावत आहे. या मालिकेने अक्षरशा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून, टीआरपी च्या बाबतीत देखील हि मालिका सर्वाना वरचढ ठरली आहे.
महाराष्ट्रातील घराघरात हि मालीका सहकुटुंब बघितली जात आहे. या मालिकेचे श्रेय अमोल कोल्हे यांना देखील जाते. या मालिकेतील अनेक प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत.
सध्या हि मालिका बघतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. 400 वर्षानंतरही येथे जन्मणार्या लेकरांच्या रक्तात ‘शिवराय-शंभुराय’ किती भिणलेत याचं हे ज्वलंत उदाहरण पहा. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालीकेची सुरुवात होत असतानाचं जे गाणं आहे. ते इतकं जबरदस्त आहे की, अवघ्या 9 महीन्याचं लेकरु सुध्दा इतिहासात हरवुन जातंय.
या लेकराला साधं “अ” सुध्दा म्हणता येत नाही. बाकी जात-धर्म-देश तर खुप लांब आहेत. मग यांच्यात ही उर्जा नेमकं येतेच कशी. कसा लागतो हा जिव्हाळा. का आजही जिव ओवाळुन टाकावा वाटतो. कसा आपोआप जिव जडतो. हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. कारण इथल्या मातीत पराक्रमाची जादु आहे. हे माञ नक्की…!
या व्हिडिओमध्ये दिसणारा चिमुरडा हा हेळंब ता.देवणी जिल्हा लातुर येथील चि. संभाजी महेश मोरे आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…